पोषण तत्त्वांनी समृद्ध असणाऱ्या सुर्य फुलाच्या बिया खाणे आरोग्यासाठी लाभदायक; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सूर्यफुलाच्या बिया तेल काढण्यापलीकडे काहीही वापरात येत नाहीत, असा विचार अगदी अयोग्य आहे. कारण, या बिया आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, कॅल्शियम आणि खनिजे ही पोषणद्रव्ये समाविष्ट असतात. त्यामुळे रोजच्या आहारात सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक असते. चला तर जाणून घेऊयात या सूर्य फुलाच्या बियांचा नेमका कसा वापर करता येईल हे जाणून घेऊ.
१) भाजलेल्या किंवा खारवलेल्या सूर्यफुलाच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. त्यामुळे या बिया सकाळी नाश्त्यात, न्याहारीसोबत खाणे लाभदायक असते.
२) सूर्यफुलाच्या बिया खाल्लाने स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो. यात चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी आणि शारीरिक थकवा यासारखे त्रास कमी होतात.
३) सूर्यफुलांच्या बिया कॅल्शिअमने समृद्ध असतात. त्यामुळे शरीरातील कॅल्शिअमची कमतरता अगदी सहजरीत्या भरून काढण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया मदत करतात. यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात आणि दातांनाही फायदा होतो.
४) सूर्यफुलांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणत असते. हे आपल्या केसांचे रक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे केसांच्या समस्यांपासून फायदा मिळतो.
टिप :- सलाडमध्ये सूर्यफूलाच्या भाजलेल्या बिया टाकून खाणे फायदेशीर ठरते. यामुळे सलाडमधील पौष्टिकता वाढते.