पावसाळी वातावरणात या भाज्या खाल तर आरोग्य येईल धोक्यात; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाळ्यात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. कारण पावसाळा सुरु झाला कि, रोगराई आणि किटकांना जोर येतो. त्यामुळे डॉक्टर्स अनेक प्रकारच्या विविध भाज्या खाण्यास मनाई करतात. त्यांपैकीच काही भाज्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊयात कोणकोणत्या भाज्या पावसाळी वातावरणात खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते. खालीलप्रमाणे:-
१) टोमॅटो – मुख्य म्हणजे पावसाळ्यात आपली पचनक्षमता कमी होते. त्यात टोमॅटोमध्ये १० हुन अधिक ऍसिड तत्त्वांचा समावेश असतो. शिवाय टोमॅटोमध्ये क्षारतत्व असतात, ज्यांना एल्कालॉयड्स म्हटले जाते. हे एक विषारी रसायन असते जे वनस्पतींचा कीटक व विषाणूंपासून बचाव करण्यासाठी वापरले जाते. यामुळे टोमॅटोचे सेवन पचनकार्यास अडथळा निर्माण करू शकते. या व्यतिरिक्त अशा परिस्थितीत पावसाळ्यात टोमॅटोचे अत्याधिक सेवन केल्याने त्वचेचे आजार होतात. उदा. त्वचेवर खाज येणे, पुरळ होणे, नॉजिया, नायटा, खरूज
टीप: आपण टोमॅटो खाण्यास इच्छुक असाल तर टोमॅटोमधील सर्व बिया काढून खाणे उत्तम राहील.
२) कोबी – सर्वसाधारणपणे कोबीचा वापर हा सॅलड, कोशिंबिर तसेच चायनीज पदार्थांसाठी केला जातो. परंतु या भाजीला अधिक थर असल्यामुळे या मध्ये बारीक बारीक कीटक किंवा अळ्या दडून बसलेल्या असतात ज्या अनेकदा निदर्शनास येत नाहीत आणि पावसाळ्याच्या दिवसात साहजिकच कीटकांचे भाज्यांमध्ये आढळण्याची प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा परिस्थितीत हे कीटक आपल्या शरीरात जाऊन आपण आजारी पडण्याची शक्यता बळावते.
टीप: आपण कोबी खाण्यास इच्छुक असाल तर कोबीची पानं वेगळी करून मिठाच्या पाण्यात भिजवून स्वच्छ करा आणि मगच त्याचे सेवन करा.
३) पालक – पावसाळ्याच्या दिवसात पालक अगदी हिरवागार दिसतो मात्र या भाजीच्या पालावर अनेक बारीक कीटक असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पालक खाणे टाळावे.
टीप: आपण पालक खाण्यास इच्छुक असाल तर काळ्या मिठाच्या पाण्यात भाजी स्वच्छ करून किमान तासभर ठेवावी आणि ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावी.
४) मशरूम – मशरूम एक अशी भाजी आहे जी प्रदूषित ठिकाणी किंवा वातावरणात आढळते. शिवाय मशरूमच्या विविध प्रजाती असतात. यात काही विषारी तर काही खाण्यायोग्य असे असतात. त्यामुळे मशरूम देखील शरीरासाठी हानिकारक असू शकतात.
टीप: आपण मशरूम खाण्यास इच्छुक असाल तर फ्रोजन व्हेजी स्टोअरमधील मशरूम विकत घ्या आणि आणल्या दिवशीच करून खा.
५) वांगी – पावसाळ्यात चमचमीत भरलं वांग खायची इच्छा कुणाला होत नाही? मात्र जिभेचे चोचले पुरवताना आरोग्याची हानी होण्याची शक्यता वाढते. कारण, पावसाळ्यात कीटक फळाफुलांवर अतिशय प्रभावी ठरतात. यामुळे पिकातील ७० ते ७५ टक्के वांगी खराब असतात. जी बाहेरून योग्य आणि दर्जेदार दिसतात मात्र आतून पोकळ आणि किडकी असतात. यामुळे पोटाचे विकार संभवतात.
टीप: आपण वांगी खाण्यास इच्छुक असाल तर आणतेवेळी वांगी हिरव्या सालाची आणावी. शिवाय वांगी स्वच्छ करताना कोमट पाण्यात मीठ घालून ते पाणी वापरावे.
- महत्वाचे – पावसाळ्याच्या दिवसात सर्वच फळे व भाज्या व्यवस्थित पाण्याने धुवूनच खाव्यात.