अति प्रमाणात ओवा खाणे आरोग्यासाठी नुकसानदायी; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। ओवा हा पदार्थ प्रत्येक घरात मिळणार अगदी सर्वसामान्य पदार्थ आहे. जो अनेकदा एखादा पदार्थ बनविताना त्याची चव आणि गंध वाढविण्यासाठी वापरला जातो. पण याव्यतिरिक्त ओवा औषधीय गुणधर्मांचा एक प्रमुख स्रोत आहे. आयुर्वेदात विविध रोगांमध्ये ओवा खाण्याचे अनेको फायदे सांगण्यात आले आहेत. ओवा एक बीज आहे ज्याला आपल्या देशात हजारो वर्षांपासून मसाल्याच्या स्वरूपात उपयोगात आणले जात आहे. ओव्याला हिंदीत अजवाइन तर इंग्रजीत कैरोम सीड्स या नावाने ओळखले जाते. निश्चितच ओवा विविध रोगांमध्ये आयुर्वेदिक औषधी म्हणून लाभदायक आहे. पण याशिवाय ओव्यामुळे शरीराचे नुकसानही होऊ शकते हे कितीजण जाणतात.
सर्वसाधारणपणे ओवा पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये गुणकारी आहे. जसे कि पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त अश्या विकारांवर ओवा फायदेशीर ठरतो. इतकेच नव्हे तर सर्दी पडसे यावर ओवा अधिक लाभदायक आहे. कारण ओवा खाल्याने शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर पडतात. यामुळे आरोग्याचे होणारे नुकसान वेळीच थांबते. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक लाभदायी कसा असेल बरं. तसेच काहीसे ओव्याबाबतदेखील आहे. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत कि ओव्यामुळे शरीराला नुकसान कसे आणि काय होते ते खालीलप्रमाणे :-
० ओव्यामुळे होणारे नुकसान
१) ओवा नेहमी ताजा आणि स्वच्छ खावा. कारण जुना झालेल्या ओव्यांतील पोषकतत्व कमी झालेली असतात यामुळे तो खाल्ल्यास काहीही फायदा होत नाही.
२) ठराविक प्रमाणापेक्षा अधिक ओवा खाल्ल्यास डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
३) जास्त प्रमाणात ओवा खाल्ल्यामुळे पोटात गॅस आणि जाळं होऊ शकतो.
४) अति प्रमाणात ओवा खाल्ल्याने आम्लपित्त आणि तोंडात अल्सर होण्याची शक्यता बळावते.
५) जास्त ओवा खाल्ल्यामुळे पोटफुगी, पोटात गॅस , पोटात गोळा येणे आणि मुरुड अश्या समस्या बळावतात.
० ओवा खाण्याचे निश्चित प्रमाण काय?
– एका वेळी १० ग्राम ओवा खाणे योग्य आहे. मात्र यापेक्षा जास्त ओवा खाल्ल्यास आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते.
० महत्वाचे:- ओवा रिकाम्या पोटी घेणे अधिक लाभदायक आहे. कारण यामुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्तता मिळते.