जास्त प्रथिने खाणे आरोग्यासाठी हानिकारक..?; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकालची जीवनशैली आरोग्याच्या तक्रारींचे मुख्य कारण आहे. अवेळी आहार, अनियमित व्यायाम, झोपेचा अभाव यामुळे शारीरिक क्रिया अस्थिर होतात परिणामी विविध आजार होण्याची शक्यता बळावते. आजच्या युगातील सर्वात सामान्य आजार म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणाने त्रासलेल्या लोकांची संख्या इतकी मोठी झाली आहे कि बस..
शिवाय लठ्ठपणामुळे इतर अनेक आजार बळावतात. अशात आता तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार शरीरासाठी आवश्यक असणारी प्रथिने खाल्ल्याने वजन कमी होते असा त्यांचा दावा आहे. काहींना हे वाचून आनंद झाला असेल पण हि बाब आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही. म्हणूनच याविषयी तज्ञ काय म्हणाले हे जाणून घेऊ.
० प्रथिने खाल्ल्यामुळे वजन कमी होते..?
तज्ञ सांगतात कि, चरबी नसलेली प्रथिने खाल्ल्यामुळे ‘प्रथिनांची विषबाधा’ होते. तसेच अतिरिक्त प्रथिनं खाल्ल्यामुळे तब्येत खालावते. कारण अतिरिक्त प्रथिनं खाल्ल्याने माणसाच्या तब्येतीवर विपरित परिणाम होतो, असे अभ्यासात सिद्ध झाले आहे. आजकाल लोक प्रोटीन बार, प्रोटीन शेक, प्रोटीन बॉल्स, असे वेगवेगळे पदार्थ खातात.
विशेष म्हणजे आपल्याला किती प्रमाणात प्रथिनं गरजेची आहेत, कोणत्या प्रकारची प्रथिनं गरजेची आहेत आणि प्रथिनांचं प्रमाण किती जास्त वा किती कमी झालं तर आपल्या तब्येतीचं नुकसान होतं हे लोकांना माहित नसल्यामुळे ते आरोग्याचे नुकसान करून घेतात.
आपल्या शरीराच्या सुदृढ वाढीसाठी योग्य प्रथिनांची गरज असते. दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी, मासे व डाळी, असे जास्त प्रथिनं असणारे पदार्थ आपल्या आहारात असायला हवेत. यामुळे पोटातील अनेक अमिनो आम्लांचं विघटन होत आणि हे आम्लं पित्ताशयाच्या फायद्याचे नसल्यास लघवीवाटे बाहेर टाकलं जात.
० किती प्रथिनं खायला हवीत..?
फार मेहनतीचे काम न करणाऱ्या लोकांच्या शारीरिक वजनाच्या प्रति किलो ०.७५ ग्रॅम इतकी प्रथिनं दररोज गरजेची असतात. म्हणजे दररोज सरासरी पुरुषांसाठी ५५ ग्रॅम, तर महिलांसाठी ४५ ग्रॅम प्रथिने गरजेची असतात.
० पुरेसे प्रथिन मिळाले नाहीत तर.. ?
शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिनं मिळाली नाहीत तर केस गळणं, त्वचेला भेगा पडणं, वजन कमी होणं आणि स्नायू कमी होणं इत्यादी समस्या उद्भवतात. परंतु, प्रथिनं कमी खाल्ल्याने उद्भवणाऱ्या या समस्या कमी प्रमाणातच पहायला मिळतात.
० अतिरिक्त प्रथिने खाल्ल्याने आरोग्याचे खरंच नुकसान होते का?
बहुतेकदा घटत्या वजनाचा संबंध प्रथिनांशी असल्याचं बोललं जातं. कमी कर्बोदकं असलेल्या पदार्थांमुळे आपलं वजन कमी होतं. काही प्रथिनंयुक्त आहारामुळेसुद्धा आपल्याला वजन कमी करायला मदत होऊ शकते. सकाळी प्रथिनयुक्त भरपेट नाश्ता केल्यास कमी भूक लागते. प्रथिनांमुळे आपली भूक पुरेशी भागते, हे सिद्ध करणारा पुरेसा पुरावा आहे.
मात्र फक्त जास्त प्रथिनं खाऊन वजन कमी होईल असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. चिकन वा मासे खाणं आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतं. पण रेड मीट किंवा मटण खाल्ल्याने आपले वजन कमी करण्याचे प्रयत्न फोल जाऊ शकतात. म्हणजेच काय तर जास्त प्रथिनं खाल्ल्याने धोका वाढतोच असं नाही. पण आपण प्रथिनयुक्त पदार्थ खाण्याच्या नादात आपण उगाच महागडी कृत्रिम पदार्थानी युक्त उत्पादनं खातो. ज्याचा तब्येतीवर विपरित परिणाम होऊ शकतो, कारण त्यात मोठ्या प्रमाणात साखर म्हणजे कर्बोदकं असतात.