Salt And Diabetes
|

Salt And Diabetes | केवळ साखरच नाहीतर तर मिठाने देखील होतो डायबिटीस, आजचा ‘या’ बदला सवयी

Salt And Diabetes | मित्रांनो जर आजकाल आपण पाहिले तर प्रत्येक घरात मधुमेह असणारा रुग्ण हा आपल्याला भेटत असतो. मधुमेह सर्वात वेगाने वाढणाऱ्या आजारांपैकी एक आजार आहे. त्यामुळे अशा लोकांच्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांकडून खास म्हणजे साखर टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण जर साखर मोठ्या प्रमाणात खाल्ली, तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि त्यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते.

परंतु नवीन अभ्यासातून आता असे समोर आले आहे की, केवळ साखर खाल्ल्यानेच नव्हे तर मीठ खाल्ल्याने देखील आपल्या रक्तातील मधून साखरेची पातळी वाढू शकते. त्या व्यक्तीला मधुमेहाचा धोका वाढतो. अमेरिकेने टुलेन युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या या अभ्यासात असे आढळून आले आहे की जेवण करताना अतिरिक्त मीठ खाल्ल्याने देखील मधुमेहाचा धोका वाढतो आता याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

हेही वाचा – Heart Attack Stroke Risk | थंडीत वाढू शकतो हृदयविकाराचा झटका, ‘या’ 7 गोष्टी आजच फॉलो करा

नवीन अभ्यास काय आहे | Salt And Diabetes

जर्नल मेयो क्लिनिक प्रोसीडिंगमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात 400,000 हून अधिक प्रौढांच्या दैनंदिन खाण्याच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. या सर्वांच्या मीठ खाण्याच्या पद्धतींचाही अभ्यास करण्यात आला. सरासरी 11.8 वर्षांच्या फॉलोअपमध्ये, टाइप 2 मधुमेहाची प्रकरणे सुमारे 13 हजार लोकांमध्ये आढळली आहेत. कमी मीठ खाणाऱ्यांच्या तुलनेत, नेहमी मीठ खाणाऱ्यांमध्ये टाइप २ मधुमेह होण्याचा धोका ३९ टक्के जास्त असल्याचे दिसून आले.

मीठ खाल्ल्याने या आजारांचा धोका असतो

टुलेन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे प्रोफेसर आणि प्रमुख लेखक डॉ. लू क्यूई म्हणाले, ‘आम्हा सर्वांना माहित आहे की जास्त मीठ सेवन हानिकारक आहे. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते. या नवीन अभ्यासानुसार, जास्त मीठ खाल्ल्याने केवळ मधुमेहच नाही तर इतर अनेक आरोग्याशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.

जास्त मीठ खाल्ल्याने होणारे आजार

  • लठ्ठपणा
  • शरीरात सूज येणे
  • हाडांमध्ये कमकुवतपणा
  • पाणी धारणा
  • उच्च बॉडी मास इंडेक्स