प्रत्येक आईने वाचायला पाहिजे असे , बाळाला लस का बर दिली जाते ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । ज्यावेळी बाळ आईच्यापोटात असते तर त्या वेळी बाळाला आणि आईला कोणत्याही प्रकारचा त्रास हा होऊ नये म्हणून नेहमी आईला गर्भ पोटात असतानाच खूप साऱ्या लसी या दिल्या जातात. आपल्या शरीरात कोणत्याही आजाराच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिकार शक्ती हि जास्त असते . त्यालाच अनेक रोगांपासून वाचण्याचे सुरक्षा कवच म्हंटले जाते . आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती कमी असेल तर त्यावेळी रासायनिक पदार्थांचा वापर हा आपल्या शरीरात केला जातो. त्यालाच अँटीबॉडीज असेही म्हंटले जाते .
जर आईला चुकून कोणत्या आजाराचा संसर्ग झाला तर त्यावेळी मात्र या लसी बाळाची आणि आईची काळजी घेतात. जोपर्यंत आईच्या शरीरातील संसर्ग का कमी होत नाही तोपर्यंत या लसीचा प्रभाव हा कमी होत नाही. या लसी बाळाच्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते . लसींचा फायदा हा आहे की तो शरीराला आजारी होऊ देत नाही. लस ही ज्या संसर्गाची लस घेतली असेल तो रोग जरी आला शरीरात तर लसीचे जिवाणू त्या संसर्गित जिवाणूंशी लढून त्यांना शरीरात राहू देत नाहीत आणि त्यामुळे शरीर आजारी पडत नाही.
बाळाला का लस दिली जाते कारण जन्म घेतलेल्या बाळाची संसर्गाविरुद्ध लढण्याची शक्ती नसते. बाळाला लगेच संसर्ग होतो. म्हणून त्याला लस दिली जाते जेणेकरून तो आजारी होणार नाही. जर त्याचा जन्म झाल्या नंतर बाळाला लस दिली गेली तर मात्र बाळाला अनेक रोगांची लागण हि होऊ शकते. बालपणापासून जर बाळाला लस दिल्या गेल्या तर त्याला आयुष्यभरासाठी त्याचे आरोग्य सुरक्षित असते. कारण पोलिओ सारख्या रोगांचे जिवाणू हे एकदा घुसल्यावर शरीराला अपंग बनवतात त्यामुळे बाळाचे आयुष्य हे त्रासदायक ठरू शकते. तसेच इतर रोगांचे आहे. म्हणून त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी लस दिली जाते ते कधीच बाळाच्या आयुष्यात आणि शरीरात पुन्हा येत नाही. कारण त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी लसीद्वारे बाळाला सुरक्षित केलेले असते. म्हणूनच आता पोलिओ, गोवर, कावीळ ह्या रोगांपासून बाळ सुरक्षित आहे. बाळाची स्वच्छता सुद्धा राखणे सुद्धा गरजेचे असते . बाळाची योग्य वेळी योग्य काळजी घेणे सुद्धा खूप आवश्यक आहे .