त्वचेवर जर काही नैसर्गिक उपाय केले तर नक्की काय होईल परिणाम
हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेकांना आपली त्वचा हि सुंदर असावी असे वाटत असते . अश्या वेळी आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी खूप सारे उपाय हे करावे लागतात. अनेक वेळा आपल्या चुकीच्या सवयी या सुद्धा आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. अश्या वेळी आपल्या त्वचेसाठी काय उपाय केले तर नेमके काय परिणाम जाणवू शकतात ते जाणून घेऊया ….
अनेक वेळा आपण पाहिले असेल कि , आपण ज्यावेळी लहान मुलांना अंघोळ घातली जाते. त्या वेळी त्यांची सारी त्वचा हि कोरडी करून त्याच्यावर आपण पावडर लावलेली पहिली असेल , त्यामुळे त्वचेला जो काही घाम येणार असेल तर तो घाम शोषून घेण्याची तयारी हि पावडर मध्ये असते . त्यामुळे त्वचेला घामाचा वास पण येणार नाही . आणि आपली त्वचा हि सुंदर राहण्यास मदत होईल . थंडीच्या वेळी आपली त्वचा हि जास्त तडकते. त्यामुळे खूप घाण अशी त्वचा दिसते. अश्या वेळी साबणाचा वापर हा कमी प्रमाणात केला जावा . त्यामुळे त्वचा हि जास्त कोरडी राहणार नाही. अश्या वेळी आपल्या त्वचेवर काही प्रमाणात क्रीम चा वापर हा केला जावा. त्यामुळे त्वचा हि कोरडी पडणार नाही.
आपल्या चांगल्या त्वचेचे आरोग्य दीर्घायुष्य टिकण्यासाठी आहारातून स्निग्ध पदार्थांचा समावेश करावा. उदा.गाईचे तूप, बदाम, खजूर इ. सारख सुका मेवान यांचा आहारात समावेश असावा. कोरड्या त्वचेसाठी दुधावरची साय किंवा बदाम वगळून लावावे. त्यामुळे चेहरा तर उजळतोच तसेच मुलायम पण होतो. त्वचेतील ओलावा टिकविण्यासाठी पाणी भरपूर प्यावे . आपल्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात ऑलिव्ह ऑइलचा किंवा तेलाचा वापर करावा. कोरड्या त्वचेसाठी शक्यतो ब्लीच चा व वापर हा टाळला जावा. त्वचेसाठी आयुर्वेदीक साबणाचा वापर हा जास्त प्रमाणात केला जावा. डाळीचे पीठ आणि हळद हि जास्त फायदेशीर ठरते.