रोज सकाळी फक्त १० मिनिटे व्यायाम करा आणि रहा फिट; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्याकडे सगळ्यात मौल्यवान अशी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे ‘आरोग्य’ होय. अहो खरंच. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. कारण आपण सुदृढ आणि निरोगी असू तर दिवसागणिक येणाऱ्या नव्या संधी आणि नव्या अडचणी दोन्हींसाठी आपण सक्षम राहू. आजच्या आधुनिक जगात प्रत्येकाला आरोग्याविषयी काही ना काही तक्रारी आहेतच. मग यावर कितीतरी डॉक्टर आणि त्यांची औषधे. बापरे! पण एवढं सगळं हवंच कशाला? यापेक्षा स्वतःला दररोजची फक्त १० मिनिटे द्या ना! आता हि १० मिनिटे कशाला? तर व्यायाम करण्यासाठी इतका वेळ पुरेसा आहे आणि इतक्याच वेळात तुम्ही मस्त आयुष्य जगायला कारण देऊ शकता.
‘व्यायाम’ म्हणजे शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली होय. व्यायामाचे अनेक असे फायदे आहेत जे आपल्या शरीराची पूर्णपणे काळजी घेतात. यासाठी दररोज सकाळी किमान १० मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या शरीराला ऑक्सिजनचा योग्य मात्रेत पुरवठा होतो आणि रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालते. व्यायामाचे पुष्कळ प्रकार आहेत. यामध्ये चालणे – फिरणे, योगासने, मोठ्याने हसणे, नाचणे, जिम करणे इ. प्रकार आहेत. याशिवाय व्यायामात अत्यंत प्रसिद्ध असणारे प्राचीन व्यायाम प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार आहे. या व्यायामाच्या प्रकारांमुळे मानवी शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. जसे कि, शरीरातील विषारी घटक निघून जातात आणि आयुष्य वाढते. चला तर जाणून घेऊयात नियमित व्यायाम करण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-
नियमित व्यायामाचे फायदे –
१) शरीर निरोगी आणि बांधेसूद बनते.
२) स्नायूंची (मसल्सची) शक्ती, लवचिकता वाढते. मसल्स मजबूत बनतात.
३) शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण घटते आणि वजन नियंत्रित राहते. .
४) शरीराच्या चयापचयाच्या गतीमध्ये सुधारणा होते.
५) हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
६) शरीर मजबूत होते. बलाची वाढ होते आणि पर्यायाने रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते.
७) रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते. यामुळे शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
८) मानसिक ताण – तणाव कमी होतो. मन ताजेतवाने, प्रसन्न बनते.
९) आळस निघून जातो.
१०) झोप व्यवस्थित लागते. .
११) शरीरात ऊर्जा टिकून राहते. भीती वाटत नाही आणि आत्मविश्वास बळावतो.
१२) कोलेस्टेरॉल नियंत्रित राहिल्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा या सर्व विकारांपासून संरक्षण होते.
० महत्वाचे –
– वजन कमी करण्यासाठी कार्डिओ वर्कआउटचं करावी. ही एक्सरसाइज केवळ फॅट बर्न किंवा वेट लॉससाठी नसून यामुळे आपण निरोगी राहतो.
– जंपिंग जॅक हा वर्कआउट अधिक सोपा आहे. जंपिंग जॅक ही एक एरोबिक कार्डिओ एक्सरसाइज असून याने वेगाने वजन कमी होतं.
– एका ठरलेल्या कालावधी पेक्षा जास्त कोणताही व्यायाम प्रकार करू नये. यामुळे शरीराचे आतून नुकसान होऊ शकते. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.