फॅट फ्री पोटॅटो मिल्क आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि आयुर्वेदात दुधाला पूर्ण आहार असे संबोधले आहे. याचे कारण म्हणजे दुधात आढळणारी तत्त्वे हि शरीरासाठी पोषक आणि तितकीच गरजेची असतात. त्यामुळे डॉक्टरसुद्धा आवर्जून अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना आहारात दुधाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे दुधाची मागणी अतिशय जोरावर आहे. पण हल्ली दुधात इतकी बनावट केली जाते की, शुद्ध दुध ओळखणे फार कठीण झाले आहे. त्यात अनेक लोकांना लॅक्टोसची एलर्जी असल्याचे आढळल्यामुळे अनेकांनी गायीचे वा म्हशीचे दूध पिणे सोडून दिले आहे. परिणामी या दुधाला पर्याय म्हणून आता बाजारात सोया मिल्क, बदाम मिल्क असे दुधाचे विविध प्रकार मिळू लागले आहेत. त्यात आता आणखी एका दुधाची भर पडली आहे. ते म्हणजे बटाट्याचे दूध. वय. तुम्ही अगदी बरोबर वाचताय बटाट्याचे दूध असाही प्रकार बाजारात उपलब्ध आहे. त्यात बटाट्याचे दूध हे आरोग्याच्या दृष्टीने फारच फायदेशीर आहे असे म्हटले जाते. त्यामुळे आता बटाट्याच्या दुधाची मागणी वाढू लागली आहे.
वीगन नावाचा प्रकार सध्या फार प्रचलित झाला आहे. अशा लोकांसाठी बटाट्याचे दूध हे शाकाहारी मानले जाते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक चांगला आणि तितकाच उत्तम पर्याय आहे. पण मित्रांनो, तुम्हीही बटाट्याचे दूध पिण्याचा विचार करत असाल तर आधी या दूधाविषयी जाणून घ्या. हे बटाट्याचे दूध गायीच्या दुधाच्या तुलनेत फारच महाग आहे. अगदी गायीच्या दुधाच्या चौपट महाग असे हे दूध आहे. परंतु बाजारातील मागणी पाहता हे बटाट्याचे दूध आता अगदी सहज मिळू लागले आहेत. हे दूध आता अनेक ब्रँडसनी सुरु केेले आहे. पूर्वी केवळ पाश्चिमात्य देशात हे दूध मिळत असे. मात्र आता आपल्या देशातही हे दूध अगदी सहज मिळू लागले आहे.
० बटाट्याचे दूध कसे तयार करतात?
– बटाट्याचे दूध तयार करताना बटाटा चांगला सोलला जातो. यानंतर त्याचा किस काढून तो पिळून त्याचे दूध काढले जाते. त्यानंतर ते टिकण्यासाठी त्यावर विविध प्रोसेस केली जाते आणि हे दूध पिण्यास योग्य केले जाते. त्यानंतर सील पॅकेटमध्ये हे दूध बाजारात मिळते. हे दूध तुम्ही थेट आणि मस्त पिऊ शकता. बटाट्याचे दूध पिण्याचे अनेक फायदेसुद्धा आहेत. माहित नसतील तर लगेच जाणून घ्या.
० बटाट्याच्या दुधाचे फायदे खालीलप्रमाणे :-
१) बटाट्याचे दूध हे चरबीमुक्त अर्थात फॅट फ्री असते. त्यामुळे हे प्यायल्याने शरीरातील फॅट वाढत नाहीत.
२) बटाट्याच्या दुधात व्हिटॅमिन D, B1 आणि फॉलिक अॅसिड असते. जे आपल्या शरीरातील ऊर्जा कायम आणि हाडांना बळकटी देण्याचे काम करतात.
३) बटाट्याच्या दुधात फायबर, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट असते जे शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते. यामुळे पोटाच्या समस्या उदभवत नाहीत.
४) बटाट्याचे दूध पर्यावरण अनुकूल असल्यामुळे त्याचे कोणतेही साईड इफेक्टस होत नाहीत.
५) अनेक आजारांपासून सुटका मिळण्यासाठी बटाट्याचे दूध पिणे फायद्याचे ठरते. जसे कि मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांनी या दुधाचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढत नाही.