युरिनमध्ये फेस येत असेल तर दुर्लक्ष करणे पडेल महागात; जाणून घ्या कारणे, परिणाम आणि उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। साधारणपणे मूत्र विसर्जन करतेवेळी फेस येणे सामान्य गोष्ट मानली जाते. यामुळे अनेकदा आपण या गोष्टीकडे गांभीर्याने न पाहता थेट दुर्लक्ष करीत असतो. मात्र युरिनमध्ये वारंवार फेस येत असेल तर दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण, लघवीमध्ये फेस येणे हे त्या व्यक्तीच्या शरीरातील अंतर्गत समस्येचे एखादे लक्षण असू शकते. शिवाय हि बाब असे सूचित करते की, त्या व्यक्तीच्या शरीरात काही निश्चित बिघाड नक्कीच असून गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. युरीनमध्ये फेस येण्याची विविध कारणे असू शकतात. आज आपण तीच कारणे, परिणाम आणि उपाय जाणून घेणार आहोत.
- कारणे :-
१) साधारणपणे गर्भारपणात लघवीत फेस दिसतो. मुळात, गरोदरपणात महिलेच्या मूत्रपिंडाच्या आकारात वाढ होते. कारण गर्भधारणेदरम्यान मूत्रपिंडात अमीनो एसिड फिल्टरचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच लघवीमध्ये फेस येतो.
२) डिहायड्रेशन हेही एक असे कारण आहे ज्यामुळे लघवीत फेस दिसतो. निर्जलीकरणामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि आपले मूत्र जड होते. यामुळेच मूत्रात फेस येऊ लागतो.
३) शरीरात जास्त प्रमाणात प्रोटीन झाल्यानंतर ते मूत्रमार्गाद्वारे उत्सर्जित केले जाते. यामुळे आपल्या मूत्रात फेस येऊ लागतो.
४) मूत्रपिंडांद्वारे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर जाताना सुद्धा आपल्या शरीरात फेस तयार होतो.
५) आपल्या युरीनमध्ये असलेला संसर्ग हे यामागील सर्वात मोठे कारण असते. जर आपल्या यूरिनमध्ये संसर्ग असेल तर, हा जंतुसंसर्ग आपल्या मूत्रातून बाहेर टाकला जातो ज्यामुळे लघवीमध्ये फेस येतो.
- परिणाम :-
१) मूत्रातील फेस कधी कधी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत दर्शविला जातो. कारण मूत्रात प्रथिने जास्त प्रमाणात असतात यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते.
२) जर मूत्रात फेस किंवा फुगे येत असतील तर ते मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण असू शकते.
३) जर लघवीमध्ये वारंवार फेस व गडद रंग दिसत असेल तर आपल्याला उष्णतेचे त्रास असण्याची शक्यता आहे. यामुळे पोटाचे विकार संभवतात.
- उपाय :-
१) दिवसभरातून किमान २ ते ३ लिटर पाणी प्या. यामुळे शरीर डिहायड्रेट होत नाही. शिवाय शारीरिक उष्णता घामावाटे उत्सर्जित होते.
२) प्रतिजैविक (अँटिबायोटिक्स) घेतल्याने ते आपल्या मूत्रमार्गापासून बॅक्टेरिया काढून टाकण्यास सुरवात करतात. (डॉक्टरांचा सल्ला आवश्यक)
३) असा कोणताही त्रास गर्भावस्थेत जाणवल्यास अधिक काळजीपूर्वक परीक्षण करण्यासाठी डॉक्टरांकडे नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे.
महत्वाचे :- हि बाब गंभीर असली तरी लगेच घाबरून न जाता त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य उपचार घ्यावेत. शिवाय कोणतेही घरगुती उपाय करण्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.