फळं खाण्याचे नियम पाळा, अन्यथा आरोग्यदायी फळे करतील शरीराचे नुकसान; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोणतेही फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे आजारपण साधं असो वा गंभीर फळांचे सेवन लाभदायी मानले जाते. पण प्रत्येक फळ खाण्याआधी ते आपल्या आरोग्यासाठी खरंच फायदे देणारे आहे का हे एकदा तपासून पहा. शिवाय फळ खाण्याच्या नियमांचे चुकूनही उल्लंघन करू नका. हो. तुम्ही बरोबर वाचताय. फळ खाण्याचे नियम असतात. हे नियम आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम असतात. त्यामुळे त्यांचे उल्लंघन आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी फळ नुकसानकारक करू शकते. फळ खाण्याचीही वेळ असते. शिवाय फळ कश्यासोबत खावं? हे देखील तितकच महत्वाचं असत. म्हणूनच मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत फळ खाण्याचे नियम. जे आपल्या शरीराची काळजी घेतील आणि आपले आजरांपासून संरक्षण करतील.
० फळ खाण्याची नियमावली खालीलप्रमाणे:-
१) फळ खाण्याची वेळ पाळा – फळं आरोग्यासाठी कितीही चांगली असली तरीही मनात येईल तेव्हा खाल्ल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. दिवसातून कधीही एक फळ खाणे चांगले हा समज पूर्णपणे चुकीचा आहे हे समजून घ्या. त्यामुळे फळ खाण्याचा योग्य फायदा हवा असेल तर खालील वेळ पाळा.
– फळं सकाळी नाश्त्यात खायला सुरुवात करा.
– जेवण्यापूर्वी फळं खाणं चांगलं असत. तर संध्याकाळी ६ नंतर फळं खाणं नुकसानकारक.
– आंबट फळं सकाळी उठल्यावर नाश्त्यात खाऊ नका. यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. त्यामुळे रिकाम्यापोटी फळं खाल्ल्याने या प्रकृतीवर उलट परिणाम होतो.
२) टरबुज फळावर पाणी पिऊ नका – टरबूज खाल्ल्यावर लगेचच पाणी प्यायची सवय असेल तर सावधान..! कारण टरबूजावर पाणी प्यायल्यामुळे डायरिया वा कॉलरासारखे आजार होण्याची भीती असते. कारण या फळामध्ये आधीच पाणी असतं. त्यामुळे त्यात अजून पाणी प्यायल्याने पोटावर ताण येतो आणि पोटाला त्रास होतो.
३) प्रकृतीनुसार फळांचं सेवन करा – कोणतेही फळ आपल्या शारीरिक प्रकृतीस स्वास्थ्यदायी आहे का? हे आधी पहा आणि मगच फळ खा. यात आपल्या शरीराचं तापमान गरम असेल वा थंड असेल तर या दरम्यान कोणते फळ खावे आणि कोणते खाऊ नये याची आधी माहिती करून घ्या.
– गरम प्रकृतीसाठी अननस, संत्र, केळी खाऊ नये.
– थंड प्रकृतीसाठी पपई, आंबा फळं टाळावी.
४) दह्यासोबत फळं खाऊ नये – अनेकांनी दह्यासोबत फळं खायला आवडते. पण असं केल्यामुळे प्रकृतीच्या उलट ताप होतो. याचा परिणाम थेट किडनी आणि पोटावर होतो. यामुळे गंभीर आजारांना सामोरे जायला लागू शकते.
५) किडनी स्टोनच्या रुग्णांनी फळं खाणे टाळावे – किडनी स्टोनच्या रुग्णांनी फळं खाणं टाळावे असे आहार तज्ञ सांगतात. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यात किडनी स्टोन असणाऱ्या रुग्णांची पचनसंस्था अतिशय कमकुवत असते. त्यामुळे कोणते फळ कधी खावे? कसे खावे? कश्यासोबत खावे? या सर्व गोष्टींची रुग्णांनी आधी डॉक्टरांसोबत चर्चा करावी आणि मगच फळाचे सेवन करावे वा करू नये.