|

Foods To Avoid During Pregnancy: गर्भारपणात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आई होण्याची फिलिंगच काही वेगळी असते. हे असं सुख आहे ज्याची तुलना कोणत्याही आनंदाशी होऊ शकत नाही. त्याच्या असण्यात आईच अख्ख जग सामावलेलं असत. आईच्या प्रकृतीवर बाळाचे आरोग्य विसंबून असते आणि म्हणून गर्भारपणात प्रत्येक लहान गोष्टीची काळजी घेणे आवश्यक असते. तर आज आपण गर्भारपणात कोणते पदार्थ खाऊ नये याविषयी माहिती घेणार आहोत. Foods To Avoid During Pregnancy

जर तुम्ही किंवा तुमच्या परिचित व्यक्तींपैकी कोणतीही स्त्री गरोदर असेल तर तिची काळजी घेणे हि तुमची प्राथमिक जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा. शिवाय जी स्त्री गरोदर आहे तिने स्वतः देखील काळजीपूर्वक वागणे अपेक्षित आहे. अनेकदा गर्भवती महिलांना काय खावे आणि काय नाही याबाबत माहिती नसते. ज्यामुळे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

Foods To Avoid During Pregnancy

मैत्रिणींनो, तुमच्या तोंडात जाणारी प्रत्येक गोष्ट हि तुमच्या आरोग्यासोबत तुमच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या विकासावर परिणाम करत असते. त्यामुळे आवडी जपताना निवड चुकणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या शरीरात जाणारे अन्न हे तुमच्या बाळासाठी विष ठरू शकते.

जाणून घ्या गर्भवती महिलांनी कोणते पदार्थ खाऊ नये. (Foods To Avoid During Pregnancy) खालीलप्रमाणे:-

० चीज, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ

milk food

१) पेस्ट्युराइज्ड दुधापासून बनवलेले इतर कोणतेही पदार्थ, जसे की मऊ चीज

२) पाश्चराइज्ड किंवा अनपाश्चराइज्ड मोल्ड- पिकलेले मऊ चीज ज्यावर बाहेरून पांढरा कोटिंग असतो. उदा. ब्री, कॅमेम्बर्ट आणि शेवर (जोपर्यंत शिजवलेले नाही तोपर्यंत)

३) पाश्चराइज्ड किंवा पाश्चराइज्ड न केलेले मऊ निळे चीज. उदा. डॅनिश ब्लू, गॉर्गोनझोला आणि रोकफोर्ट (जोपर्यंत शिजवलेले नाही तोपर्यंत)

४) पाश्चराइज्ड गायीचे दूध, शेळीचे दूध, मेंढीचे दूध किंवा मलई

० का खाऊ नये?

पाश्चराइज्ड किंवा पिकलेल्या दुग्धजन्य पदार्थांमुळे लिस्टिरियोसिस नावाचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे मुळे गर्भपात किंवा मृत अर्भकाचा जन्म होऊ शकतो वा नवजात बाळ खूप आजारी पडू शकते. याशिवाय त्याचा बाहेरील पांढरा कोटिंग असलेला मऊ भाग अधिक ओलावा टिकवून ठेवतो. ज्यामुळे यातील बॅक्टरीया वाढतो. म्हणून हे पदार्थ गरम करून शिजवून खाणे योग्य ठरते. यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतो आणि लिस्टरियोसिसचा धोका कमी होतो.

० मांस आणि पोल्ट्रीचे पदार्थ

१) डुकराचे मांस

२) चरबीयुक्त सॉसेज थंड

३) प्री- पॅक केलेले मांस

४) कच्चे किंवा कमी शिजलेले मांस

५) यकृत आणि यकृत उत्पादने

० का खाऊ नये?

गर्भारपणात कच्चे वा कमी शिजवलेले मांस खाल्ले तर टॉक्सोप्लाज्मोसिस होण्याचा धोका असतो. ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो. यातील परजीवी जंतू बाळाच्या विकासात अडथळा निर्माण करतात. याशिवाय यकृत उत्पादनांमध्ये भरपूर व्हिटॅमिन ए असते. जे न जन्मलेल्या बाळासाठी हानिकारक असू शकते.

० अंड्याचे पदार्थ

Egg

१) कच्ची वा अर्धवट शिजवलेली कोंबडीची अंडी

२) कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले बदक, हंस किंवा लहान पक्ष्यांची अंडी

३) अंड्याचा पिवळा बल्क

० का खाऊ नये?

अंडी व्यवस्थित शिजलेली नसतील आणि ती खाल्ली तर न जन्मलेल्या बाळाला हानी पोहोचवण्याची शक्यता असते. कारण अश्या अंड्यातून शरीरात अन्नातून विषबाधा होऊ शकते. परिणामी बळावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

० मासे

१) तेलकट मासे. उदा. सॅल्मन, ट्राउट, मॅकेरल किंवा हेरिंग

२) स्वॉर्डफिश

३) मार्लिन

४) शार्क

५) कच्चा शेलफिश

० का खाऊ नये?

इतर माशांपेक्षा या माश्यांमध्ये जास्त पारा असतो. दरम्यान जास्त पारा खाल्ल्याने न जन्मलेल्या बाळाला हानी पोहचू शकते. तसेच तेलकट माशांना मर्यादित ठेवा. कारण यामध्ये डायऑक्सिन आणि पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्ससारखे प्रदूषक असू शकतात. जर तुम्ही हे जास्त खाल्ले तर न जन्मलेल्या बाळाचे आरोग्य बिघडू शकते. तसेच कच्च्या शेलफिशमध्ये हानिकारक जीवाणू, विषाणू असू शकतात. हे तुम्हाला आणि बाळाच्या प्रकृतीला अस्वस्थ करतात.

० इतर पदार्थ आणि पेये

१) कॅफीन –

Tea

दररोज 200mg पेक्षा जास्त कॅफीनयुक्त पेयाचे सेवन करू नये. यामुळे दिवसभरातून केवळ १ कप चहा/ कॉफी यांपैकी एक कोणतेही पेय घ्यावे.

२) दारू –

Alcohol

गरोदरपणात मद्यपान केल्याने बाळाला दीर्घकालीन हानी होऊ शकते. त्यामुळे गर्भवती असाल वा बेबी प्लॅनिंग करत असाल तर सर्वात आधी अल्कोहोल बंद करा. यामुळे तुमच्या बाळाला जोखीम कमी राहील.

३) हर्बल टी –

Green Tea

संपूर्ण दिवसभरातून ४ कप पेक्षा जास्त हर्बल चहा पिऊ नये.

४) फळे, भाज्या आणि सॅलड्स –

Vegetables

फळे, भाज्या आणि सॅलड्सच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. बाजारातून आणल्यानंतर धुवून स्वच्छ करून शिजवल्याशिवाय भाज्या खाऊ नये. तसेच बराच वेळ फळे कापून ठेवून खाऊ नये. यामुळे विषबाधा होण्याची शक्यता कमी होईल.

५) गुळ –

गुळ स्वभावाने उष्ण असल्यामुळे गर्भासाठी हानिकारक ठरतो. त्यामुळे गुळाचे अतिसेवन करू नये.

६) शेंगदाणे –

Peanut

तसे पाहता गरोदर असताना शेंगदाणे टाळण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला नट्सची ऍलर्जी असेल तर शेंगदाणे टाळा.

७) जीवनसत्त्वे –

उच्च डोस मल्टीविटामिन सप्लिमेंट्स किंवा व्हिटॅमिन ए असलेले कोणतेही पूरक गर्भारपणात घेऊ नका.