लसणीच्या पाकळ्या करतील फंगल इन्फेक्शन दूर; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाळ्याच्या दिवसात त्वचेच्या समस्या अधिक त्रासदायक होतात. अनेकांना या दिवसामध्ये त्वचेला खाज येणे, त्वचेवर पुरळ येणे, त्वचा लाल होणे, तळव्यांची जळजळ, त्वचा निघणे अश्या अनेक त्वचेशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे पावसाच्या दिवसात त्वचेची काळजी अधिक घेणे गरजेचे असते. तसेच पावसाळ्याच्या हंगामात अत्याधिक लोक फंगल इन्फेक्शनमुळे त्रस्त असतात. याबाबत विशेष बाब अशी कि, अनेको विविध उपचार करूनही फंगल इन्फेक्शनची समस्या काही केल्या दूर होत नाही. पण आम्ही तुम्हाला एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे फंगल इन्फेक्शनची समस्या आणि त्वचेशी संबंधित होणारे अन्य त्रास कायमचे दूर होण्यास मदत होईल. या उपायात फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर आहे. आधी लसणाची ओळख करून घेऊ मग उपाय जाणून घेऊ.
लसणाचे झुडूप २ ते ३ फुट वाढते. खोड घट्ट,पाने अरुंद आणि चपटी असे त्याचे स्वरूप असते. याच्या मुळाला लसूण कंद म्हणतात. या कंदावर पांढरे आणि पारदर्शक आवरण असते. लसूण थंड आणि कोरड्या हवामानात वाढतो. लसणाच्या लागवडीसाठी सुपीक, भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची आवश्यकता असते. त्यामुळे तिचे कंद चांगले पोसवतात आणि लसूण काढणे अगदी सोपे जाते. अति उष्ण लसणाचे कंद लागवडीसाठी पाण्याची खूप गरज असते. हे बागायती पिक आहे. पाण्याची सोय असल्यास हे पिक बारमाही घेता येते.
आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते. कारण, शरीर निरोगी ठेवण्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर असते. लसूणमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई असते. त्यामुळे लसणीचे सेवन शरीरासाठी खूप लाभदायक असल्याचे मानले जाते. यासाठी दररोज सकाळी किमान ७ ते ८ लसूण पाकळ्या खाल्ल्या पाहिजे. लसूण केवळ रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच नव्हे तर अन्य बऱ्याच आजारांवर गुणकारी आहे.
० उपाय
– लसूणच्या सहाय्याने फंगल इन्फेक्शन दूर करता येते. यासाठी आपल्याला साधारण ७ ते ८ लसूण पाकळ्या लागणार आहेत. या लसूण पाकळ्यांची बारीक पेस्ट तयार करा. हि पेस्ट ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झाले आहे तिथे किमान १० मिनिटे लावून ठेवा चोळू नका. त्यानंतर थंड पाण्याने तो भाग स्वच्छ धुवा. मात्र, फंगल इन्फेक्शनला लसूण लावताना कायम एक गोष्ट लक्षात असू द्या की, लसूणची पेस्ट करताना त्यामध्ये दूसरे काहीही मिसळू नका. लसूणची पेस्ट लावल्यानंतर निश्चितच थोडा त्रास होईल. जसे कि, झोंबणे वा आगआग होणे. मात्र, सतत आपण ४ दिवस लसूण पेस्ट फंगल इन्फेक्शनवर लावली तर फंगल इन्फेक्शनची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल.