दररोज प्राणायाम करून मिळवा निरोगी जीवन
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या दररोज च्या कामकाजातून काहीसा वेळ काढून आपण आपल्या शरीरासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे . सकाळी उठून प्राणायाम केले तर मात्र आपल्या शरीराला त्याचे फायदे तर होतात तसेच निरोगी राहण्यास सुद्धा मदत होते . आपल्या शरीराला ऑक्सिजन ची गरज हि असतेच . पण तो कसाही घेणे मात्र आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही . एका ठराविक प्रमाणातच आणि योग्य प्रकारे घेतला गेला पाहिजे. सूर्योदयापूर्वी जर तुम्ही प्राणायाम करत असाल तर त्याचे अफलातून फायदे आहेत कोणते ते जाणून घेऊया …
वजन कमी करण्यास मदत —
जर तुम्ही सतत एका ठिकाणी बसत असाल किंवा तुमचे काम हे एका ठिकाणावरून होत असेल तर त्यावेळी तुमच्या पोटाचा घेर हा वाढण्यास सुरुवात होते . पोटाचा घेर वाढल्याने उठण्या बसण्याच्या समस्या या जास्त वाढतात . अशा वेळी मात्र आपले वजन हे कमी करण्यासाठी प्राणायाम मधील कपालभारती याचा वापर हा केला जावा. त्यामुळे पोटाचा घेर हा कमी होण्यास मदत होऊ शकते .
सुंदर त्वचा —
जर तुमची त्वचा सुदंर हवी असेल तर सकाळी उठल्या उठल्या योग करणे आवश्यक आहे . कारण त्याच्या मदतीने तुमच्या शरीरातून जे विषारी द्रव्य असतात .ते विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होऊ शकते . आणि शरीराला योग्य प्रमाणात श्वास घेतल्याने आपल्या शरीराची इतर कार्ये सुद्धा अगदी व्यवस्थित पार पडतात . त्वचेखाली असलेल्या कोलॅजनला वाढण्यास मदत मिळते. प्रदूषण, धूळ, माती, घाण या खाली दडलेली त्वचा मोकळा श्वास घेते. त्वचेला असणारे पिंपल्स, तेलकट त्वचेचे त्रास यामुळे दूर होण्यास मदत मिळते.
पचनशक्ती सुधारते —
जर तुमचे दररोज चे जीवनमान हे कधीही उठा आणि कधीही खा अशा प्रकारचे झाले असेल तर त्यावेळी मात्र पचन शक्ती खराब होऊन बुद्धकोष्ठतेचा त्रास हा जास्त निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पचनसंस्थेला त्रास हा जास्त वाढतो. जर नेहमी असा त्रास जाणवत असेल तर त्यावेळी मात्र सकाळच्या वेळेत प्राणायाम करणे आवश्यक आहे .