उपाशी पोटी तूप-मिरी खालं तर अनुभवालं आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या स्वयंपाक घरात रोजच्या वापरातील मसाले फक्त जेवणाची लज्जत वाढवतात? तर मैत्रिणींनो हा तुमचा गोड गैरसमज आहे. कारण अनेक मसाले असे आहेत जे जेवणाची चव नक्कीच वाढवतात पण त्याच सोबत तुमच्या आरोग्याचीदेखील व्यवस्थित काळजी घेतात. जसे कि काळीमिरी. हो. अगदी बरोबर वाचताय काळीमिरीच. मिरी चवीने तिखट आणि वासाला अतिशय सुगंधी असते. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फ्लेव्होनॉइड्स आणि इतर अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. इतकेच नव्हे तर कॅन्सरच्या पेशींना प्रतिबंध करतात. यामुळे साहजिकच आपल्या आरोग्याचे रक्षण होते. पण काळीमिरी जर तुपासोबत मिसळून खाल्ली तर त्याचा आणखी लाभ होतो.
कारण काळीमिरीमध्ये जितके पोषक घटक आहेत त्या प्रत्येकाचा शरीराला फायदा व्हावा यासाठी तूप फायदेशीर आहे. कारण तूप खाल्ल्याने असेही शरीराला बरेच फायदे होतात. अशा स्थितीत काळी मिरी मिसळलेले तूप रोज खाल्ल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. फक्त हे मिश्रण उपाशी पोटी खायचे आहे हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला योग्य ते फायदे मिळतील. तुमचा विश्वास बसत नसेल तर हि माहिती पूर्ण वाचा आणि काळी मिरी तुपात मिसळून खाण्याचे किती लाभ आहेत हे जाणून घ्या.
उपाशी पोटी तूप मिरी खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-
रोगप्रतिकारक शक्तीत सुधार – काळी मिरी आणि तुपाचे सेवन उपाशी पोटी केल्यास अनेक फायदे मिळतात. या मिश्रणाच्या सेवनाने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील सुधारते आणि मजबूत होते. यामुळे कोणताही विषाणू आपल्या शरीरात शिरकाव करू शकत नाही. यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी १ चमचा गायीच्या तुपात २ ते ३ काळीमिरी बारीक करून मिसळा आणि याचे सेवन करा.
संसर्गापासून सुटका – तूप आणि काळ्या मिरीच्या मिश्रणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म समाविष्ट आहेत. ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण मिळते. यामुळे व्हायरल फ्लू आणि अन्य कोणताही संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता कमी होते.
कोरड्या खोकल्यावर प्रभावी – सर्दी झाली कि कफ होतो आणि कफ झाला कि खोकला. त्यात जर कोरडा खोकला असेल तर खोकून खोकून छाती दुखायला लागते. यात तूप आणि काळी मिरी यांचे मिश्रण अत्यंत परिणामकारक लाभ देतात. यासाठी १ चमचा देशी तूप आणि १/२ चमचा काळीमिरी एकत्र मिसळून खा. असे दिवसातून २ वेळा केल्यास कोरडा खोकला दूर होईल.
दृष्टी वाढ – देशी तूप आणि काळी मिरीचे मिश्रण दररोज सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने आपल्या डोळ्यांच्या दृष्टीत सुधार होतो आणि दृष्टी वाढते. यासाठी १ चमचा देशी तुपात १ चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळून त्याचे नियमित सेवन करा.
मधुमेहासाठी फायदेशीर – मधुमेहींसाठी काळ्या मिरीचे सेवन अत्यंत फायदेशीर मानले जाते. आधीच पथ्य पाण्याने हैराण मधुमेहींना दिलासा देण्यासाठी काळ्या मिरीमध्ये तूप मिसळून द्या. या मिश्रणाचे सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते. कारण काळीमिरी आणि देशी तुपाच्या मिश्रणात अँटी-हायपरग्लायसेमिक घटक असतात जे अनेक लाभ देतात.
ताणतणाव दूर – तूप आणि काळ्या मिरीच्या मिश्रणात पाइपरिन असते आणि त्यात नैराश्यविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे या मिश्रणाचे सेवन केल्या ताण आणि तणावाची समस्या दूर होते. परिणामी हायपर टेन्शन आणि डिप्रेशनच्या समस्येवर मात करता येते.
लठ्ठपणावर परिणामकारक – लठ्ठपणाच्या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी वाढलेले वजन कमी करणे म्हणजे अतिशय कठीण काम. पण अशा लोकांनी काळ्या मिरीचे तुपासोबत सेवन केले तर आश्चर्यकारक फायदा होईल. कारण काळ्या मिरीतील पाइपरिन आणि अँटीओबेसिटी इफेक्ट्स वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
निरोगी त्वचा – काळी मिरी केवळ चव आणि आरोग्यासाठी नव्हे तर त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठीही वापरली जाते. कारण काळ्या मिरीपासून बनवलेल्या तेलामध्ये अँटी- ऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.