ताकाच्या सहाय्याने मिळवा सुंदर आणि निरोगी केस; कसे वापरायचे ते जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अशी अनेक लोक असतील ज्यांना जेवल्यावर खाल्लेले अन्न पाचवे म्हणून ताक पिण्याची सवय असेल. कारण ताक चयापचय क्रियेसाठी अत्यंत फायदेशीर असते. पण मित्रांनो ताकाचा फक्त एव्हढाच फायदा आहे असं वाटत का तुम्हाला..? तर तुम्ही अगदी चुकीचे आहात. कारण ताक हे केसांच्या आरोग्यासाठीदेखील अत्यंत फायदेशीर आहे. आता ते कसं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर फार विचार करू नका. हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती मिळवा.
ताक हे शरीराला आतून थंडावा देणारे पेय आहे. जे अनेक थंड आणि पौष्टिक गुणधर्मयुक्त आहे. यामुळे अनेकांना वाटतं कि, ताक केवळ पचनासाठीच चांगलं. तर मित्रांनो ताक फक्त पचनासाठीच नव्हे तर केसांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आता केसांच्या उत्तम पोषणासाठी आणि अधिक फायद्यांसाठी ताक कसे वापरायचे ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
० केसांसाठी ताक वापरून असे बनवा हेअरपॅक:-
ताजे ताक थेट टाळूला लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसातील कोंडा कमी होईल. कोरड्या त्वचेमुळे येणारी खाज दूर होईल आणि केस मुलायम होतील.
हेअर मास्क 1– केसांसाठी ताक वापरताना ऑलिव्ह ऑइलमध्ये अंडी आणि केळी घालून एक आरोग्यदायी हेअर मास्क बनवता येईल. हा हेअर मास्क तुमच्या केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल. या हेअर मास्कमुळे टाळू निरोगी आणि स्वच्छ राहिल. परिणामी केस निरोगी राहतील.
हेअर मास्क 2 – याशिवाय ऑलिव्ह ऑईलमध्ये ताक मिसळून त्यात पिकलेली केळी बारीकी करून घ्या. यानंतर १ अंड आणि १ चमचा मध घाला. आता तयार हेअर मास्क केसांना लावा आणि अर्धा तास असेच ठेवा. यानंतर हर्बल हेअर क्लींजर वापरून केस स्वच्छ धुवा. यामुळे टाळू व्यवस्थित स्वच्छ होईल आणि केसात घामामुळे साचलेली घाण निघून जाईल.
हेअर मास्क 3 – ताज्या ताकात लिंबाचा रस वा व्हिनेगर मिसळून केसांना आणि टाळूला लावा. यामुळे कितीही जुना कोंड्याचा त्रास दूर होईल.
० केसांसाठी ताकाचे काही फायदे:-
१. ताक डोक्यातील कोंड्यावर अत्यंत प्रभावी असा घरगुती उपाय आहे. शिवाय ताक लावल्याने खाज सुटलेल्या टाळूला आराम मिळतो.
२. ताकातील गुणधर्म केसांच्या मुळांना मजबूत करते. यामुळे केसगळती थांबते. शिवाय केसांना नैसर्गिक चमक येते.
३. ताकाच्या वापराने केस मजबूत होतात. परिणामी केसांचा व्हॉल्युम वाढतो.
४. ताकामध्ये अत्यंत आवश्यक प्रोटीन असतात. हे घटक केसांच्या मुळापासून खोल पोषण देतात. तसेच ताकाच्या वापराने नवीन केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते आणि केस घनदाट होण्यास मदत होते.
० महत्वाचे – केसांच्या कोणत्याही समस्यांवर उपचार करण्यासाठी ताक वापरताना सर्वात आधी थोड्याशा केसांवर ते लावून पाहा. कोणताही त्रास होत नसेल तरच याचा वापर करा.