Ghee Benefits | रोज एक चमचा तूप खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ फायदे, आरोग्य तज्ञांनी दिली महिती
Ghee Benefits |तूप हा भारतीय जेवणाच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. जुन्या काळी बहुतेक पदार्थ तुपात शिजवले जायचे, पण आता तुपाबाबत अनेक समज आहेत. प्रश्न पडतो की रोज एक चमचा तूप खाऊ शकतो का? तुम्ही लठ्ठपणाचे शिकार व्हाल? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज एक चमचा तूप खाऊ शकतो. यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही परंतु तुमच्या शरीराला नक्कीच अनेक फायदे होतील. आयुर्वेदानुसार तूप आणि लोणी खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि पोटासाठीही खूप फायदेशीर आहे.
माध्यमातील वृत्तानुसार ‘यशोदा हॉस्पिटल्स’ हैदराबादचे फिजिशियन आणि डायबिटीज स्पेशालिस्ट डॉ. रंगा संतोष कुमार यांनी दररोज तुपाचा थोडासा भागही खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. हाडे मजबूत होऊ शकतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते. मात्र, जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला गंभीर हानी होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा- Foods For Glowing Skin | चमकदार त्वचा मिळवायची असेल तर आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश नक्की करा
पौष्टिक पॉवरहाऊस | Ghee Benefits
तुपात हेल्दी फॅट्स असतात आणि ते फॅटी ऍसिडचाही खूप चांगला स्रोत आहे. या चरबीमध्ये जीवनसत्त्वे ए, ई आणि डी भरपूर प्रमाणात असतात. जे एकंदर आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. याव्यतिरिक्त, तुपामध्ये ब्युटीरिक ऍसिड असते. जे संभाव्य दाहक-विरोधी गुणधर्मांसह शॉर्ट-चेन फॅटी ऍसिड आहे. शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता तूप खाल्ल्याने भरून काढता येते, असे यशोदा रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर डॉ.दिलीप गुडे यांनी सांगितले. तसेच त्वचा चमकदार आणि निरोगी बनवता येते. जर तुम्ही रोज एक चमचा तूप खाल्ले तर तुमच्या सांधेदुखीपासून आराम मिळेल आणि हाडे मजबूत होतील. याशिवाय आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.
मुलांची स्मरणशक्ती सुधारते
तूप खाल्ल्याने मुलांची स्मरणशक्ती सुधारते. याशिवाय दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
किती तूप खावे
तूप मर्यादित प्रमाणातच खावे कारण ते शरीरासाठी फायदेशीर असेल तर त्याचे तोटेही आहेत. विशेषत: 40 वर्षांवरील लोकांनी मर्यादित प्रमाणात तूप खावे.