डाळीला परफेक्ट तडका द्या आणि मिळवा आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या भारतीय आहारात डाळींचे एक विशेष महत्व आहे हे आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती मान्य करेल. कारण जोपर्यंत ताटामध्ये चपातीसोबत भाजी आणि भातासोबत डाळ नसते तोपर्यंत जेवणाचं ताटसुद्धा अपूर्ण वाटतं. आपल्या भारतीय आहारामध्ये मूग डाळ, तूर डाळ, चणा डाळ, मसूर डाळ अश्या विविध डाळींचा समावेश आहे. या प्रत्येक डाळीमध्ये अनेक विशेष गुणधर्म समाविष्ट आहेत जे आपल्या शरीराची काळजी घेण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. मात्र डाळीला जर अस्सल तूप आणि खमंग फोडणी दिली तर? तिच्या चवीमध्ये शंभर पटीने वाढ होतेच शिवाय तिच्या पोषक तत्वांमध्येही वाढ होते. आता तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर या प्रश्नच उत्तर आज आम्ही देणार आहोत.
– आपल्यापैकी अनेकजण असे असतील ज्यांना डाळ तडका खायला प्रचंड आवडत असेल. अश्या प्रत्येकाची आवड हि आरोग्यदायी म्हणायला हरकत नाही. कारण डाळीला तडका देताना यामध्ये तूप वा तेल, मोहरी, जिरे, लसूण, मिरची, कडीपत्ता, कोथिंबीर, हळद, मीठ आणि पाणी अश्या विविध पदार्थांचा वापर केला जातो. यातील प्रत्येक पदार्थात काही असे घटक समाविष्ट आहेत जे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहेत. चला तर जाणून घेऊयात डाळीचा परफेक्ट तडक आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर कसा ठरतो ते खालीलप्रमाणे:-
- तुरीच्या डाळीला तुपाची फोडणी दिल्यास याचा फायदा आपल्या शरीराला होतो. यामुळे शरीर थंड राहते आणि उष्णेतेचा त्रास होत नाही.
- डाळीमध्ये चिमूटभर हिंगाचा वापर खरंतर डाळीची चव आणि सुगंध वाढविण्यासाठी करतात. पण मित्रांनो डाळीमध्ये हिंगाचा वापर केल्यास पोटाचे त्रास दूर होतात. मुख्य म्हणजे गॅसची समस्या दूर होते. याशिवाय खाल्लेले अन्न योग्यरीत्या पचण्यास मदत होते.
- कोणत्याही डाळीला फोडणी देताना जिरे घातल्यास पोटातील अशुद्ध पदार्थ बाहेर उत्सर्जित करण्यास मदत होते. जिरे हा पचन क्रियेसाठी रामबाण उपाय आहे. पोटफुगी, जुलाब, आम्लपित्त आणि अपचनाची समस्याही जिऱ्याच्या सेवनाने दूर राहते. यामुळे दुपारच्या वा रात्रीच्या जेवणात डाळ बनविताना जिरे फोडणीत घालायला विसरू नका.
- कोणत्याही डाळीला फोडणी देताना मोहरीच्या दाण्याचा वापर कराच. कारण मोहरी खाल्ल्याने स्नायूंचा त्रास दूर होतो. शिवाय कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने मोहरीचा तडका फायदेशीर आहे.
- तूर, मूग, मसूर यांपैकी कोणत्याही डाळीला लसणाची फोडणी दिल्यास याचा फायदा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होते. कारण लसणीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी यांसारख्या समस्या दूर राहतात.
- काही लोक डाळीत कढीपत्ता वापरतात. एकतर यामुळे डाळीच्या फोडणीला खमंग असा वास येतो आणि कढीपत्त्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे पचनक्रिया योग्य व सुरळीत चालते. शिवाय मधुमेहाचा धोका दूर होतो आणि त्याचबरोबर हृदयाच्या आरोग्यासाठी फायदा होतो. शिवाय कढीपत्त्यात फायबर, कार्ब्स, व्हिटॅमिन ई, बी, ए, सी, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियम देखील चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे आरोग्यासाठी कडीपत्त्याची फोडणी असलेली डाळ एकदम उत्तम आहे.
- मसूर आणि तूर डाळीत मोहरीच्या तेलात आले-लसूण टाकून खमंग फोडणी दिल्यामुळे मसूर डाळीचा उग्र वास निघून जातो आणि ती पचायला मदत होते. तर तूर डाळीला लसूण आणि आले टाकून दिलेल्या तडक्यामुळे हि डाळ खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होत नाही. शिवाय पोटात गॅस तयार होणे अपचन यांसारख्या समस्या जाणवत नाहीत.
- डाळीमध्ये तडका देताना मिरची आणि टोमॅटोचा वापर केला जातो. यामुळे डाळीचे सौंदर्य लक्षवेधक होते. शिवाय या दोन्ही पदार्थांमध्ये अँटी एजिंग घटक समाविष्ट असतात. यामुळे त्वचेला लाभ होतो.