| | | |

चहा प्रेमींसाठी आरोग्यदायी गुलाबाचा चहा; जाणून घ्या कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो, कंटाळा आला, झोप आली, उत्साह नाही यावर एकच उपाय असतो आणि तो म्हणजे चहा. त्यात पाहुणे घरी आले, पाहायला स्थळ आलं तर हमखास घरात बनवतो तो चहा. असा पदार्थ एक पण प्रसंग अनेक. त्यामुळे चहाप्रेमींची संख्या आणि चहाची बातच काही और आहे. पण रोज रोज तोच तोच साधा चहा काय प्यायचा? कधीतरी थोडा टेस्टी आणि थोडा हेल्दी चहा प्यायला काय हरकत आहे? म्हणून आज आपण एका वेगळ्या फ्लेवरच्या चहाबद्दल जाणून घेणार आहोत. या चहाला तुम्ही प्रेमाचा चहा म्हणून शकता कारण याचा संबध गुलाबाशी आहे. होय. आज आपण गुलाबाच्या चहाविषयी जाणून घेणार आहोत. गुलाब या फुलापासून तयार केलेला हा चहा प्यायल्याने अनेको आरोग्यदायी फायदे होतात. चला तर आधी हा चहा कसा बनवायचा ते जाणून घेऊ आणि यानंतर चहाचे फायदे जाणून घेऊ.

० गुलाब चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – २ गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या, २ कप पाणी, २ चमचे लिंबूचा रस, १ चमचा मध

कृती – सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी घ्या आणि गरम करा. त्यानंतर या गरम पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका. साधारण १० मिनीटे त्या पाकळ्या पाण्यामध्ये चांगल्या उकळू द्या. यानंतर पाण्याचा रंग बदलू लागेल. नंतर हे पाणी गाळून एका कपमध्ये घ्या. यात लिंबू रस आणि मध घाला. झाला तुमचा गुलाबाचा चहा तयार.

सेवन – हा चहा नियमित सकाळी आणि अगदी संध्याकाळी देखील पिता येईल. दिवसातून २-३ वेळा हा चहा घेऊ शकता.

फायदे

१) गुलाबाच्या चहामध्ये अॅण्टी ऑक्सिडेण्ट असतात हे घटक वजन कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर दिवसातून २ वेळा दररोज हा चहा प्यावा.

२) गुलाब चहामध्ये दूध किंवा साखर आणि कोणताही केमिकल रंग नसतो. हा चहा एक नैसर्गिक हर्बल चहा आहे. यामुळे गुलाब चहामध्ये फायबरयुक्त घटक आढळतात. यामुळे आपली पचनक्रिया चांगली होते.

३) गुलाबाचा चहा नैसर्गिक गुणधर्मांची परिपूर्ण असल्यामुळे हा चहा आपल्या शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करतो. त्यामुळे आपले शरीर निरोगी आणि दिवसभर उत्साही राहण्यास मदत मिळते.

४) गुलाबाचा चहा हा कॅफिन फ्री असतो. यामुळे गुलाबाचे चहा प्यायल्याने शरीराला नुकसान होत नाही शिवाय ती आरोग्यासाठी उपयुक्त असून त्याने पोट भरल्यासारखे वाटते.

५) गुलाबाचा चहा नैसर्गिक गुणधर्मयुक्त असून यात जीवनसत्व क भरपूर आहे. तसेच हा हर्बल चहा असल्यामुळे अनेको आजारांपासून आपल्या शरीराचे रक्षण करतो आणि आपली प्रतिकारशक्ती मजबूत बनवतो.

६) गुलाबातील गुणधर्म आपला चेहरा टवटवीत, उत्साही आणि तेजस्वी बनविण्यास मदत करतो. त्यामुळे हा गुलाबाचा चहा नियमित प्यायल्याने त्वचेचा रंग उजळतोच शिवाय केसही मजबूत होतात.

७) मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्मेल थेरेपी केली जाते. यामध्ये गुलाबाचाही समावेश असतो. यामुळे गुलाबाच्या चहामुळे स्ट्रेस कमी होतो आणि मूडही चांगला होतो.