Hearing Loss
|

Hearing Loss: Bluetooth’चा अधिक वापर बहिरेपणाला देई आमंत्रण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Hearing Loss आजकाल स्मार्टफोनचा वापर इतका वाढलाय कि काही बोलायचं कामच नाही. अगदी लहान मुलांपासून, तरुण, युवक आणि अगदी वृद्ध लोकांमध्येही स्मार्टफोनचं भलतंच क्रेझ आहे. फक्त फोन नव्हे तर फोनच्या ऍक्सेसरीजनेही आपले जीवन व्यापून टाकले आहे. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब या व्यतिरिक्त ब्लूटूथ वापरणाऱ्यांची संख्या फार मोठी झाली आहे. बरं ब्लूटूथ काही सोशल मीडियाचा भाग नाही तर वायरलेस हेडफोन आहे. काही लोकांना चोवीस तास फोनवर बोलायची सवय असते. अशावेळी वायरचा हेडफोन वापरणे गैरसोयीचे होते. मग असे लोक आपोआपच ब्लूटूथकडे वळतात.

अनेकदा लोक आपल्या आवडत्या कलाकारांना फॉलो करणं पसंत करतात. तुम्ही अनेक सिनेमांमध्ये पहिले असेल कि हिरो हिरोईन बागेत वॉल्क करताना किंवा बिजनेस मीटिंगमध्ये असताना त्यांच्या कानाला एक छोटंसं यंत्र चिकटलेलं असत. त्यालाच तर ब्लूटूथ म्हणतात. (Hearing Loss) आजकाल ब्लूटूथ माहित नाही असे फार कमीच लोक उरलेत. बाकीचे तर ब्लूटूथ वापरत आहेत. लोकांना वायरलेस ब्लूटूथ गरजेचा आणि जीवनशैलीचा अविभाज्य घटक वाटू लागलाय. याचे कारण म्हणजे, ना वायरची झंझट.. ना वायर खराब होण्याचा ताप.. ना आपण ऐकत असलेल्या गाण्यांना इतरांना त्रास. त्यामुळे ब्लूटूथ अगदी सोयीचे यंत्र झाले आहे. पण जे साध सोप्प वाटत ते फायदेशीर असेलच असे नाही.

काही लोकांना याची इतकी सवय झालेली असते कि ते कानात घातल्याशिवाय बरेच वाटत नाही. (Hearing Loss) पण ब्लूटूथच्या अतिवापराने काही भयंकर दुष्परिणामही होऊ शकतात याकडे सोयीने दुर्लक्ष केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याविषयी तज्ञ काय सांगतात ती माहिती देणार आहोत. जेणेकरुन हेडफोन वा ब्लूटूथ वापरताना तुम्ही आवश्यक ती खबरदारी घ्याल. मित्रांनो गाणी ऐकायला कुणाला आवडत नाही..? पण काही गोष्टींवर वेळीच रोख लावणे अत्यंत आवश्यक आहे. काही सतत कानात हेडफोन वा ब्लूटूथ घालून गाणी ऐकल्याने कानाचे पडदे खराब होऊ शकतात. इतकेच काय तर मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. चला तर जाणून घेऊ काय सांगतात तज्ञ.

० काय सांगतात तज्ञ..?

तज्ञ सांगतात कि, ब्लूटूथ किंवा हेडफोनचा वापर करणे पूर्णपणे चुकीचे नाही. मानवी जीवन सुलभ आणि सोयीचे व्हावे म्हणूनच याचा वापर केला जातो. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. तसेच सतत कानात ब्लूटूथ असणे देखील वाईट आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याचे कारण म्हणजे, आपल्या कानाचे पडदे नाजूक असतात. यावर तीव्र ध्वनीचा मारा झाल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते. यामुळे कानाचा पडदा कमकुवत होऊ शकतो आणि परिणामी बहिरेपण येऊ शकते. (Hearing Loss)

इतकेच नव्हे तर कानातून ध्वनी किरणे थेट मेंदूच्या कार्यावरही परिणाम करत असतात. तणावमुक्त होण्यासाठी म्युझिक थेरेपीचा वापर केला जातो. मात्र सतत कोमल वा तीव्र ध्वनी किरणे कानावर पडत राहिली तर याचा परिणाम मेंदूच्या नसांवर होतो. ज्यामुळे मेंदू अकार्यक्षम होऊ शकतो. शिवाय मानसिक अस्थैर्य देखील येऊ शकते.

झोपताना गाणी ऐकण्याची सवय वाईट आहे असे तज्ञ सांगत नाहीत मात्र ऐन झोपेच्या गाणी ऐकण्याच्या सवयीमुळे शरीरावर आणि झोपेवर त्याचा परिणाम होतो असे संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यामुळे नियमित Artifical Sound ऐकून झोपण्याची सवय असेल तर ती आरोग्यास खूप हानिकारक आहे.

शिवाय नेहमी आपला मोबाईल सतत सोबत ठेवणे किंवा जरा वेळसुद्धा मोबाईल बाजूला ठेवल्यास बैचेन झाल्यासारखे वाटणे हे आपले आरोग्य बिघडत असल्याचे गंभीर संकेत आहेत. अशावेळी त्वरित मोबाईल आणि ऍक्सेसरीजपासून अंतर राख अन्यथा मेंदूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असेही अभ्यासात सिद्ध झाले आहे.

(Hearing Loss) याशिवाय संशोधनानुसार, जेव्हा तुम्ही गाणी ऐकत झोपता तेव्हा तुमचा मेंदू पूर्णरित्या झोपलेला नसतो. तसेच मेंदूमधील काही भागांना आराम मिळत नसल्याने आपण झोपेत असतानाही मध्येमध्ये उठतो. यामुळे कानाला इयरफोन्स, ब्लूटूथ, बड्स लावून झोपणे हे कानासाठी घातक ठरु शकते. कारण आपण ऐकत असलेली गाणी आणि त्याचा आवाज थेट मेंदूच्या नसांवर परिणाम करत असतो. असे बराच वेळ गाणी ऐकणे आणि मुख्य म्हणजे रात्रीच्या शांततेत कानांवर ध्वनी लहरींचा मारा करणे यामुळे कमी ऐकण्याचा त्रास जाणवतो.

० हेडफोन, ब्लूटूथमुळे कानांचे आरोग्य कसे बिघडते..? (Hearing Loss)

सगळ्यात महत्वाचे म्हणजे, तुम्ही हेडफोन लावून वारंवार गाणे ऐकत असाल तर तुमच्या कानातल्या बॅक्टेरियांची संख्या ७०० पटीने वाढत असते. सोबतच तुम्ही कोणत्या प्रकारचे हेडफोन वापरता हे देखील महत्त्वाचे आहे. कमी किमतीत मिळणारे हेडफोन वापरल्यास बहिरेपणा येऊ शकतो.

१) हेडफोनद्वारे कानावर सातत्याने पडणारा मोठ्ठा आवाज कानाच्या आतल्या पडद्यावर आदळत असतो. श्रवणयंत्रणेतल्या कॉकलिया या भागावर त्याचे काही परिणाम जाणवायला लागतात. सातत्याने आवाजाचा मारा होत गेल्यामुळे हा नाजूक भाग बधीर होतो आणि बहिरेपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत गाणी ऐकणे टाळा. ऐकायची असल्यास कमी आवाजात हेडफोन न लावता ऐका. (Hearing Loss)

२) समजुतीनुसार, मोबाईलमधला आवाज इतर आवाजांपेक्षा लहान असतो. पण हा एक गैरसमज आहे. कारण मोबाईलचे गाणे तुलनेने कमी आवाजाचे वाटले तरी त्या गाण्याचा हेडफोन कानातल्या कॉकलिया यंत्रणेला थेट जोडलेला असतो. म्हणजे ते ध्वनी थेट या भागावर आदळतात, हे लक्षात घ्या.

३) मोबाईलवरची गाणी ऐकण्यासाठी ज्या प्रकारचे हेडफोन वापरले पाहिजेत, त्याप्रकारचे वापरले जात नाहीत. उलट स्वस्तात मिळणारे आणि कानाला इजा पोहोचवणारे हेडफोन वापरले जातात आणि यामुळे कानांचे आरोग्य आणखीच बिघडते. म्हणून गाणी ऐकताना आपण कोणता हेडफोन वापरतो हे ही लक्षात घेतले पाहिजे आणि थेट कानामध्ये खोलवर जाणारे हेडफोन टाळले पाहिजेत. (Hearing Loss)

४) दिवसभर मोबाईल कानाला लावून बसणे धोकादायक आहे. अशा प्रकारे तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तुमच्या श्रवण क्षमतेची हानी होते. जे लोक रोज तासापेक्षा अधिक काळ मोबाईल कानाला लावत असतील तर त्यांना स, फ, ह, ट, आणि झ अक्षरांपासून सुरू होणारे शब्द ऐकण्यात अडचणी येतात. पुढे जाऊन त्यांना दोन आवाजातील भेदही ओळखणे अवघड जाते.

५) मोबाईलवर बोलण्यासाठी उजव्या कानाचा जास्त वापर केल्यास त्या कानाद्वारे कमी ऐकू येते. अनेकदा फोन आला किंवा आपण लावला असेल तर सगळ्यात आधी फोन उजव्याच कानाला लावला जातो. त्यामुळे उजव्या कानाचे जास्त नुकसान होते. (Hearing Loss)

६) मुख्य आणि भीषण म्हणजे हेडफोन कानात असल्यामुळे अपघात होऊ शकतात. कारण कानात हेडफोन असल्यास शेजारील परिस्थितीचे भान राहत नाही. म्हणून गाडी चालवताना अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष होते. समोरून किंवा पाठीमागून येणाऱ्या वाहनाने हॉर्न वाजवला तरी ऐकू येत नाही. त्यामुळॆ अपघात होऊ शकतो. यामध्ये एकतर जीव जातो नाहीतर अपंगत्व येते.

‘हे’ पण वाचा :-

कानाच्या आरोग्याविषयी पडणाऱ्या 10 महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे; लगेच जाणून घ्या

कानात मळ का साचतो आणि तो काढायचा कसा?; जाणून घ्या