Heart Attack : तुम्ही देखील हार्ट अटॅकचे पेशंट असाल तर सावधान! आहारातील ‘या’ गोष्टी आजच बंद करा
Heart Attack | आजकाल या धावपळीच्या जगात अनेक लोकांची लाईफस्टाईल बदलली आहे. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झालेला दिसत आहे. आज काल जास्तीत जास्त हार्ट अटॅकच्या पेशंटची संख्या जास्तीत जास्त वाढत चालली आहे. ज्या लोकांना एखादा हार्ट अटॅकचा एखादा झटका येऊन गेला आहे, त्या लोकांसाठी त्यांचे जेवण खूप चांगल्या पद्धतीने असते महत्त्वाचे आहे. या आजारामध्ये त्यांना काही पदार्थ हे बंद केले पाहिजेत.
हार्ट अटॅक (Heart Attack) असणाऱ्या पेशंटला त्यांच्या जेवणामध्ये मिठाचे प्रमाण कमी करणे खूप गरजेचे आहे. जर त्या लोकांनी जास्त मीठ खाल्ले तर त्यांचे ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते. आणि हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते. तसेच त्यांना साखरेचे प्रमाण देखील कमी करावे लागते. कारण यामुळे त्यांचे ब्लड आणि शुगरमध्ये देखील वाढ होऊ शकते.
हेही वाचा – Brain Health : मेंदूचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; मानसिकदृष्ट्या तुम्हीही रहाल फिट
तळलेले पदार्थ खाऊ नये– Heart Attack
आईस्क्रीममध्ये खूप मोठ्या प्रमाणात साखर असते. त्यामुळे हार्ट अटॅक असणाऱ्या पेशंटनी सहसा आईस्क्रीम खाऊ नये. त्यामुळे त्यांचे ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्यासोबतच त्यांनी तळीव-मळीव प्रभात देखील खाल्ले नाही पाहिजे जसे की पराठे,पुरी,समोसे यांसारखे पदार्थ खाल्ल्याने त्यांच्यात कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
हे सगळं तर हार्ट अटॅक (Heart Attack) असणाऱ्या पेशंटनी पाळलेच पाहिजे. यासोबतच त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्यांच्या आहारामध्ये बदल केला पाहिजे. हार्ट अटॅक असणाऱ्या पेशंटसाठी कोणता डायट योग्य आहे जेणेकरून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल या सगळ्याची माहिती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी.
हेही वाचा – Herpes Disease : नागीण आजार संसर्ग जन्य आहे का? समज व गैरसमज जाणून घ्या