तुमच्या बाळाच्या दातांची काळजी घेण्यासाठी या करा गोष्टी
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या घरात जर छोटी मोठी बाळे असतील तर त्याचे लाड प्यार खूप जास्त प्रमाणात होतात. त्याच्यासाठी आजीआजोबांपासून सगळे लोक चॉकलेट किंवा आईस्क्रिम खायला देतात . आजकाल खूप लहान वय असणाऱ्या मुलांचे सुद्धा दात किडलेले आपण पहिले असतील मुलांचे दात किडेल तर मात्र त्यांना खाताना खूप जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो. तसेच ते अजिबात चांगले दिसत नाही . अश्या वेळी आपल्या मुलांच्या चॉकलेट खाण्यावर जास्त लक्ष दिले गेले पाहिजे . प्रमाणाच्या बाहेर जर मुले चॉकलेट खात असतील तर मात्र त्यांचे दात हे किडतात.
लहान मुलांची दातांची निगा राखणे आणि त्यांच्या दातांना किडण्यापासून रोखणे ह्या गोष्टी जवळपास पालकांच्या हातात असतात. आजकाल मुलांना अश्या सगळ्या गोष्टींपासून रोखणे हे खूप आव्हानात्मक झाले आहे. आत्ताची मुले पौष्टीक खाण्यापेक्षा साधे चॉकलेट आणि चिप्स खाण्याकडे जास्त कल असतो. अनेक वेळा मुले चॉकलेट खातात पण चुळा मात्र भरायला विसरतात. त्यामुळे मुलांच्या दातांच्या फटीत जास्त प्रमाणात चॉकलेट साठले जाते आणि त्या बॅक्टरीयाचे इन्फेकशन होऊन मुलांचे दात हे जास्त किडतात. अडकलेले चॉकलेट काढणे हे जास्त गरजेचे असते. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळ मुलांचे दात साफ करणे आवश्यक आहे .
ज्यावेळी आपण आपल्या बाळाला दूध पाजून घेतल्यानंतर बाळाच्या हिरड्या कोमट किंवा गरम पाण्याच्या फडक्याने साफ करून घ्यायच्या. ह्या गोष्टीमुळे दुधातील शर्करेचा बाळाच्या दातांवर कोणताच परिणाम होणार नाही. बाळाला दात हे साधारण सहा महिने झाले कि यायला लागतात. सुरुवातीला बाळासाठी खूप काळजी घ्यावी लागते. बाळाला साखर किंवा मिठाची सवय खूप लहानपानपासून लावू नये. साखर दातांवर परिणाम करते आणि लहान बाळ आपल्यासारखी दात घासत नाहीत. त्यामुळे त्यांची दाते हि लवकर खराब होतात.