Herpes Disease
|

Herpes Disease : नागीण आजार संसर्ग जन्य आहे का? समज व गैरसमज जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात परंतु काही आजार असे असतात ज्यांचे नाव ऐकताच आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते त्यातील एक आजार म्हणजे नागीण (Herpes Disease) . नागीण हा शब्द ऐकताच आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते परंतु नागीण आजार हा एक व्हायरल इन्फेक्शन मुळे होणारा आजार आहे. हा काही गोष्टींची काळजी घेतल्याने बरा देखील होऊ शकतो परंतु त्यासाठी योग्य उपचार पद्धती लवकर करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला नागीण आजार हा संसर्गजन्य आहे का किंवा या आजारा संदर्भात समाजामध्ये व सर्वसामान्य लोकांमध्ये काही समज व गैरसमज आहेत त्याबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत व आपल्याला नेमके काय उपचार करायचे आहेत जेणेकरून या आजारापासून आपल्याला लवकर मुक्तता मिळेल हे देखील जाणून घेणार आहोत.

काय आहेत नागीणची लक्षणे – Herpes Disease

नागीण सर्वसामान्यप्रमाणे 30 ते 50 या वयोगटातील लोकांना होणारा एक असा एक आजार आहे. या विशिष्ट वयामध्येच लोकांना या आजाराची लक्षणे दिसून येतात. नागीण हा आजार (Herpes Disease) प्रामुख्याने विषाणू संसर्गाने होत असतो, अशावेळी रुग्णांच्या शरीरावर लाल रंगाचे चट्टे पडतात. कालांतराने खाज देखील सुटू लागते व त्यानंतर गोल आकाराचे पुरळ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा पुरळ उठल्यावर त्यामध्ये पाण्याचे फोड येऊ लागतात किंवा पस देखील निर्माण होतो. बहुतेक वेळा ही पुरळ मानेवर चेहऱ्यावर पाठीवर दिसून येतात. पूर्ण शरीराचे एका बाजूलाच अनेकदा पाहायला मिळते. चेहऱ्याच्या उजव्या किंवा बाज डाव्या बाजूला दिसून येते. ज्या ठिकाणी हे इन्फेक्शन झालेले असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आग होते. जर तुम्हाला अशा प्रकारची काही लक्षणे दिसून आली तर हलगर्जीपणा करू नका. डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपचार करा, अन्यथा भविष्यात त्रास होऊ शकतो.

जर तुमच्या शरीरावर आलेली नागीण (Herpes Disease) कानापर्यंत पोहोचली तर तुम्हाला ऐकू येणे कमी होऊ शकतो तसेच तोंडाच्या आत मध्ये गेल्यावर जीभेची चव संवेदना देखील जाऊ शकते म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला घ्या.नागीण वर योग्य उपचार केल्याने हा आजार दूर करता येतो. हा आजार विषाणूच्या माध्यमातून होत असल्याने संसर्ग देखील काही प्रमाणात होऊ शकतो. जर पुरळ मधून पस बाहेर आलेला असेल आणि हा फस जर निरोगी माणसाच्या शरीराला लागला तर इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते तसेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल, तुम्हाला कॅन्सर, एच आय व्ही एड्स सारखा आजार झाला असेल तर अशावेळी हा आजार होऊ शकतो अन्यथा जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना होण्याची शक्यता असते. सर्वसामान्य मनुष्याला या आजाराची लागण होण्याची शक्यता कमी असते. नागिण झालेल्या रुग्णांकडे फारसे येणे जाणे करू नका. काळजी घ्या शारीरिक स्वच्छता ठेवा आसपासचा परिसर निरोगी राहील, याची काळजी देखील घ्या.