High Blood Pressure Home Remedy : झटपट हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आजपासून ‘हे’ पेय घ्यायला करा सुरुवात
High Blood Pressure Home Remedy : हल्ली ब्लड प्रेशरची समस्या प्रत्येकाला सतावत आहे. तरुण वयापासून ते ज्येष्ठ नागरिकांना ही समस्या उद्भवतांना दिसून येत आहे. डॉक्टर देखील हैराण झालेले आहे आणि ब्लड प्रेशर ची समस्या घेऊन प्रत्येक जण सध्या जगत आहे. जर तुम्हाला देखील सकाळी संध्याकाळी ब्लड प्रेशर ची गोळी घ्यावी लागत असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी आहे.
तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेले उपाय तर करायचे आहेच पण त्याचबरोबर जर तुम्ही घरच्या घरी काही उपाय केले तर तुमच्या शरीराला फरक देखील दिसून येईल. आजच्या या लेखांमध्ये आपण घरच्या घरी बनवता येणारे असे काही पेय म्हणजेच ड्रिंक कसे बनवायचे याबद्दल जाणून घेणार आहोत. या ड्रिंकचा वापर केल्याने तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात येईल.
हाय ब्लड प्रेशर ची समस्या निर्माण झाल्याने अनेकदा हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते तसेच शरीराला लखवा देखील येऊ शकतो, म्हणूनच भविष्यात कोणत्याही प्रकारचे गंभीर आजार होऊ नये याकरिता जर तुम्ही काही घरच्या घरी उपाय घरी केले तरी तुम्हाला फरक पडू शकतो, चला तर मग जाणून घेऊया आपल्याला घरगुती पद्धतीने कोणते पेय तयार करायचे आहे, जेणेकरून तुमचे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात येईल.
ग्रीन टी (Green Tea Benefits in Marathi)
सध्या अनेकजण ग्रीन टी सेवन करत असतात. ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात, ज्यामुळे तुमचा वाढलेला हाय ब्लडप्रेशर सर्वसामान्य लेवलवर येऊ शकतो. या ग्रीन टी चे सेवन केल्याने तुमच्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक जमा झालेल्या आहेत, ते निघून जातील परिणामी रक्त भिसरण प्रक्रिया व्यवस्थित होईल. भविष्यात ब्लडप्रेशर वाढणार नाही म्हणून दिवसभरातून एकदा ग्रीन टी चे सेवन आवश्यक करा.
आल्याचा चहा (Ginger Tea Benefits in Marathi)
ज्या रुग्णांना हाय ब्लड प्रेशर समस्या वारंवार सतावत असते, अशा रुग्णांनी आल्याची चहा पिणे लाभदायक ठरू शकते. ही चहा बनवण्यासाठी देखील खूपच सोपी असते. आले खाल्ल्याने तुम्हाला बरे तर वाटते पण त्याचबरोबर आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म सोबतच अँटी एलर्जी गुणधर्म देखील असतात तसेच आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आवश्यक तत्त्व आल्या मध्ये उपलब्ध असतात. तुम्ही अद्रक म्हणजेच आल्याची चहा बनवताना एक चमचा मध देखील मिसळू शकता, यामुळे तुमच्या शरीराला संरक्षण कवच देखील मिळेल अशा प्रकारे एक कप आल्याची चहा तुम्हाला हाय ब्लड प्रेशर पासून मुक्तता मिळवून देईल.
जास्वंदाची चहा
आपल्या सर्वांना जास्वंदाचे फुल माहितीच आहे. या जास्वंदाच्या फुलाच्या मदतीने आपण हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणू शकतो. जास्वंदामध्ये इंथो सायनीन आणि फ्लेवोनोइड नावाचे तत्व असतात, जे तुमच्या हाय ब्लड प्रेशरला नियंत्रणात आणतात. जर तुम्ही एक कप जास्वंदाची चहा दिवसभरातून सेवन केले तर तुमचे शरीर का निरोगी राहील पण त्याचबरोबर ब्लडप्रेशरची समस्या मुळापासून नष्ट होईल. ही चहा बनवण्यासाठी तुम्हाला फुलाच्या पाकळ्या गरम पाण्यामध्ये उकळून चहा बनवायची आहे अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने देखील तुम्ही जास्वंदीची चहा तयार करू शकता. चवीनुसार तुम्ही साखर किंवा गूळ वापरू शकता.
डाळिंब चा रस
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये आणण्याकरिता डाळिंब चा रस खूपच लाभदायक मानला जातो. डाळिंब मध्ये रक्तभिसरण प्रक्रिया सुरळीत करण्याची क्षमता तर असतेच पण त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे तुमच्या शरीरातील घाण देखील बाहेर पडते तसेच आपल्या शरीरातील रक्त पातळ करण्याचे कार्य डाळींबचा रस करतो म्हणूनच दिवसभरातून किंवा तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा डाळिंब चे फळ किंवा डाळींचा रस अवश्य सेवन करा.
टीप : वरील माहिती सर्वसाधारणपणे सांगण्यात आलेले आहे उपाय करण्याआधी तज्ञ मंडळी व डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.