Home remedies for back pain
|

पाठदुखीपासून दूर राहण्यासाठी घरगुती उपाय

हॅलो  आरोग्य ऑनलाईन ।  आपल्याला पाठीच्या दुखण्याच्या त्रास जाणवत असेल तर त्यावेळी मात्र आपल्याला नकोसे वाटते. पाठदुखीचा त्रास हा जास्त जाणवायला लागला तर मात्र त्यावेळी झोप लागत नाही. कोरोनाच्या परिस्थितीत सगळीकडे घरातून काम सुरु आहे. त्यामुळे कंबरेचा काही भाग हा त्रासदायक ठरू शकतो. जास्त काळ हा एका जागेवर बसून राहिल्याने सुद्धा तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. एकाच स्तिथीत बराच काळ हा बसून राहिल्याने आपल्याला त्रासदायक ठरू शकतो.

—- खुर्चीवर बसल्यामुळे आपल्याला खूप त्रास जाणवतो. अश्या वेळी आपल्या कंबरेच्या पाठीमागे कुशन ठेवून काम केले जावे. आपण ज्या खुर्चीवर बसतो त्या ठिकाणी आपण पाठीमागे एक गरम पाण्याची बॅग भरून ठेवावी त्यामुळे आपल्या कंबरेला जरा आराम मिळेल.

— आपण ज्यावेळी अंघोळ कराल त्यावेळी गरम पाण्यामध्ये काही प्रमाणात निलगिरीच्या तेलाचा जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे आपल्या पाठदुखीच्या समस्या या कमी होत जातील . त्यामुळे तणावाचा स्तर सुद्धा कमी होऊ शकतो.

—- एक ग्लास गरम दुधात काही प्रमाणात हळद टाकावी. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. काही मधाचे थेंब त्या दुधात टाकावीत . हे जर दूध दररोज पिले तर त्यावेळी आपल्या पाठदुखीचा त्रासाचे प्रमाण हे कमी होत जाते.

—- खोबरेल तेल आणि कापूरचे काही मिश्रण एकत्र करून ते एका बाटलीमध्ये भरून ठेवा. ते तेल त्याचा वापर हा दररोज पाठदुखीच्या समस्यांसाठी केला जावा. पाठदुखीला मालिश केले तर पाठदुखीचे प्रमाण हे कमी होत जाते.