Home Remedies For Rainy Disease
| |

Home Remedies For Rainy Disease: पावसाळ्याचं आगमन सोबत आणतं आजारपण; जाणून घ्या पावसाळी आजारांवर घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Home Remedies For Rainy Disease) सध्या राज्यात पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण निसर्ग आणि माणसाचे मन प्रफुल्लित तसेच आनंदी झाले आहे. पावसाचा प्रत्येक थेंब धरणीसाठी जितका सुखावणारा असतो, तितकाच मानवी जीवनातही आनंद आणणारा असतो. पावसाळ्यात वातावरण दमट तसेच थंड होते.

उन्हाळ्यातील सूर्यकिरणांचा दाह बऱ्याच पटीने कमी झालेला असतो आणि झाडे झुडुपे हिरवीगार झालेली दिसतात. विविध ठिकाणी झरे, नद्या, तलाव आणि विहिरी तुडुंब वाहू लागतात. शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. असा हा पाऊस सगळ्यांच्या आयुष्यात नवी उमेद घेऊन येतो. पण पाऊस येताना एकटा येत नाही बरं का… तर पावसाळा आला कि साहजिकच त्याच्या मागोमाग आजारपण येत. मग अशा आजाराचं करायचं काय..? (Home Remedies For Rainy Disease)

तर पावसाळा हा ऋतू अनेकांचा आवडता आहे. त्यामुळे साहजिकच पावसाच्या सरी अंगावर झेलणे, पावसात चिंब भिजणे, फिरायला जाणे, पावसाळ्यात प्रामुख्याने गरमागरम भजी आणि चहावर ताव मारणे, तसेच भाजलेला तिखट गोड मका खाणे लोकांच्या आवडीचे विषय आहेत. हे सगळं करत असताना एक वेगळाच आनंद आपण अनुभवत असलो तरीही या आनंदाला कुठेतरी आजाराचं गालबोट लागतंच.

पावसाळ्यात रोगराई आणि साथीचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. प्रामुख्याने वातावरणातील बदल, पाणी आणि आहारातून या आजाराचा प्रसार होतो. त्यामुळे तज्ञ पावसाळ्याच्या दिवसात गरम पाणी आणि शक्यतो घरगुती आहाराचाच लाभ घेण्याचा सल्ला देतात.

पावसाळा सुरू झाला, की तापमानात सतत बदल होत असल्याचे दिसून येते. दरम्यान हवेत एक प्रकारचा ओलावा आलेला असतो. त्यात सूर्य ढगांआड जाऊन सगळ्यांची मजा पाहत असतो. त्यामुळे सूर्याच्या कडक किरणांमुळे ज्या जंतूंचा नायनाट होतो ते जंतू बिनधास्त हवेत वावरू लागतात. (Home Remedies For Rainy Disease)

दरम्यान अशा वातावरणात आपली रोग प्रतिकार शक्ती हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे साहजिकच सर्दी- पडसं, ताप, खोकला, कफ, फ्लू असे आजार हळूहळू डोकं वर काढू लागतात. अशा दिवसांमध्ये कफ होणे, घसा दुखणे, दम लागणे, खोकला येणे, अशक्तपणा अशा समस्यांनी जीव अगदी नकोनको होतो. मग अशा पावसाळी आजारांचं काय करायचं..? असा प्रश्न घरातील प्रत्येक स्त्रीला पडतो.

(Home Remedies For Rainy Disease) तर मैत्रिणींनो आता चिंता सोडा. कारण आज आपण याच पावसाळी आजारांवर सोप्पे आणि प्रभावी घरगुती उपाय कोणते..? हे जाणून घेणार आहोत. हे उपाय तुमच्या घरातील प्रत्येकाची काळजी घेतील. अगदी तुमच्या मुलांपासून ते घरातील आजी आजोबांपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी हे उपाय फायदेशीर भूमिका निभावतात. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया पावसाळी आजारांवरील घरगुती उपाय खालीलप्रमाणे:-

पावसाळी आजारांवर प्रभावी घरगुती उपाय
(Home Remedies For Rainy Disease)

१) गवती पात आणि आल्याचा गुणकारी चहा

पावसाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराचे तापमान हळूहळू कमी होऊ लागते. ज्यामुळे थंडी आणि ताप अशा समस्या जाणवू लागतात. अशावेळी गवती पात आणि आल्याचा वापर करून कडकडीत चहा बनवा आणि त्याचे सेवन करा.

यासाठी चहामध्ये साखरेचा वापर करू नका. तर याऐवजी चहामध्ये काळ्या गुळाचा वापर करा. असा चहा दिवसातून दोनवेळा प्यायल्यास नक्कीच फायदा होईल.

२) तुळशीचा काढा

पावसाळ्याच्या दिवसात कितीही सुदृढ व्यक्ती असली तरीही त्याची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. बाहेरच वातावरण इतक्या वेगाने बदलत असतं कि त्याचा शरीरावर परिणाम होतोच. म्हणून अशा दिवसात तुळशीचा बहुगुणी काढा पिणं कधीही फायदेशीर आहे. (Home Remedies For Rainy Disease)

Tulsi-Ginger Kadha

यासाठी एक कप पाणी घ्या त्यामध्ये ८ ते १० तुळशीची पाने, एक इंच आलं, १ टीस्पून ज्येष्ठमध, ४ काळीमिरी, २ लवंग, १ वेलची आणि एक तुकडा गूळ इतके जिन्नस मिसळून हे पाणी व्यवस्थित कढवून घ्या. तयार काढा दिवसातून २ वेळा प्यायल्यास चांगला लाभ मिळेल.

३) कोरफड, मिरी आणि मधाचं चाटण

पावसाळ्यात अनेकदा काहीबाही खाण्याची सवय अंगलट येते. शिवाय बऱ्याच ठिकाणी पाणीही खराब येत. ज्यामुळे घसा सुजतो. सर्दी होते. अशावेळी शरीराचे तापमान आवश्यक मात्रेत वाढविणे आणि सोबत रोग प्रतिकार शक्ती मजबूत करणे गरजेचे असते. तरीही आजारी पडतोय अशी चिन्ह दिसू लागलीच तर अशावेळी कोरफड, काळीमिरी आणि मधाचे चाटण अतिशय फायदेशीर भूमिका बजावते. (Home Remedies For Rainy Disease)

यासाठी एक चमचा कोरफडीच्या गरात अर्धा चमचा मिरपूड आणि १ चमचा मध मिळून याचे चाटण तयार करा. दिवसातून ३ ते ४ वेळा हे चाटण जिभेला लावा. असे केल्याने घश्यातील संक्रमण दूर होण्यास मदत मिळेल.

३) हळदीचं दूध

आपण अनेकवेळा वाचले असेल कि हळदीमध्ये अँटी बॅक्टरील गुणधर्म असतात. ज्यामुळे हळद विविध आजारांवर प्रभावी भूमिका बजावते. पावसाळ्याच्या दिवसात मस्त गरमागरम हळदीचं दूध रोज रात्री पिणे फायदेशीर आहे.

Termeric Milk

एकतर दूध पूर्णब्रह्म असल्यामुळे पोटाला आधार मिळतो आणि हळदीतील विषाणूंशी लढणारे गुणधर्म आजारांपासून दूर ठेवतात. पण लक्षात ठेवा घश्यातील संक्रमणाची तक्रार असेल तर दूध पिणे टाळा.

४) मिठाच्या गुळण्या

salt water gargle

मिठाचा राकट स्वभाव घश्यातील संक्रमण दूर करतो. मीठासोबत पाण्यात जर हळद मिसळून गुळण्या केल्या तर आणखी लवकर आणि प्रभावी फायदा मिळतो. (Home Remedies For Rainy Disease) पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा घश्यातील संक्रमणाचा त्रास होतो. हा त्रास होऊ नये यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास आराम मिळेल.

५) कोमट पाणी

hot water

पावसाळ्याच्या दिवसात साथीचे रोग पसरविण्यात सगळ्यात मोठा हात पाण्याचा असतो. अर्थातच पाण्यात होणारा बदल आणि वातावरणातील बदल विषाणूंच्या वाढीस चालना देते. यामुळे पाण्यातून संक्रमणाचा धोका अधिक असतो. मात्र जर पाणी गरम करून प्यायलात तर यातील विषाणू नष्ट होतात. ज्यामुळे पाण्यातून संक्रमणाचा धोका टाळता येतो. (Home Remedies For Rainy Disease)

६) गाईचे तूप

Cow Ghee

पावसाळ्यात सर्दी झाली आणि त्यामुळे जर नाक चोंदलं तर श्वास घेताना फार अडचण निर्माण होते. यावर सरळ साधा आणि सोप्पा घरगुती उपाय म्हणजे अशावेळी नाकात ३ थेंब गाईचे तूप घाला. यामुळे चांगला परिणाम मिळतो. अगदी काही वेळातच चोंदलेले नाक मोकळं होत आणि आराम मिळतो.

७) आलेपाक

अनेकदा पावसाळ्याच्या थंड वातावरणाचा त्रास होतो. मुख्य म्हणजे ज्यांना सांधेदुखी, संधिवात, आमवात अशा वाताच्या समस्यांचा त्रास असतो त्यांचे तर भयंकर हाल होतात. अगदी चालता चालतादेखील त्यांचा वाताचा त्रास होतो. अशा समस्येवर अत्यंत प्रभावी म्हणजे गूळ तूप आणि आल्याच्या साहाय्याने बनविलेला आलेपाक. (Home Remedies For Rainy Disease)

Aalepak

या आल्याच्या खायला अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी असतात. यासाठी आल्याची पेस्ट करून तुपावर भाजून घ्या आणि यात गुळाचा पाक घालून हे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळा. तयार मिश्रण एका ताटाला तूप लावून काढा आणि यातील ओल गेला कि याच्या वड्या कापून मस्त आस्वाद घ्या.

७) नियमित व्यायाम

ऋतू कोणताही असला तरीही व्यायामाला पर्याय नाही. व्यायामामुळे शरीरातील जखडलेले सांधे मोकळे होतात. शिवाय नियमित व्यायाम केल्याने रोग प्रतिकार शक्ती मजबूत राहते. त्यामुळे उन्हाळा असो.. पावसाळा असो किंवा हिवाळा व्यायामाला पर्याय शोधूच नका.

Exercise

तर हे होते पावसाळी आजारांवरील सोप्पे आणि प्रभावी असे घरगुती उपाय. यंदाच्या पावसाळ्यात हे उपाय जरूर करून पहा आणि पावसाळी आजारांपासून सुटका मिळवा. (Home Remedies For Rainy Disease)

‘हे’ पण वाचा :-

पावसाळी कोरडे वातावरण त्वचेचे नुकसान करतेय? तर वापरा या टिप्स; जाणून घ्या

हि पावसाळी भाजी करते मोठमोठ्या व्याधींचा खात्मा; जाणून घ्या

पावसाळी दिवसात मधुमेहाच्या रुग्णांनी पायांची काळजी कशी घ्यावी?; जाणून घ्या

पावसाळी वातावरणात या भाज्या खाल तर आरोग्य येईल धोक्यात; जाणून घ्या