आपले पोट जर वाढले असेल तर त्यासाठी घरगुती उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन | पुरुषांचे एका ठराविक वयानंतर पोट सुटण्यास सुरुवात होते. जर पोट खूप मोठ्या प्रमाणात सुटले जात असेल तर त्याच्यासाठी काही प्रमाणात घरगुती उपाय करणे आवश्यक आहे . त्यासाठी आपण आपल्या आहारात बदल करावे लागतील. यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना या केल्या जाव्यात यासाठी कोणत्या प्रकारचे आहारात बदल करावे लागतील.
— आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवावं, कारण प्रथिन शरीरात पटकन वापरली जातात.
— एकंदरीत आहार कमी करावा.
— साखरे ऐवजी गुळाची पावडर वापरू शकता.
— जेवणानंतर जर भूक लागली असेल तर, फळं खावीत.
— उकडलेल्या पालेभाज्या त्यात थोडं सैंधव मीठ टाकून खावं, बेस्ट..सगळ्यात उत्तम आहार आहे.
— पोळ्या किंवा चपाती, जे काही तुम्ही म्हणता ते, कमी जाडीच्या, आकाराने छोट्या असाव्यात.
— दररोज तीन ते चार लिटर पाणी प्यावे.
—- रात्रीचं जेवण संध्याकाळी सातलाच करावे.
— आठवड्यातून एकदा पोटाचा घेर सेंटीमीटर मधून मोजावा, दर आठवड्याला नोंद ठेवावी.
— दररोज नियमित पणे सकाळी व्यायाम हा केला जावा.