मासिक पाळीच्या दरम्यान पोटदुखीपासून दूर राहण्यासाठी घरगुती उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन । प्रत्येक मुलीला वयाच्या ठराविक दिवसानंतर मासिक पाळी येतच अशा वेळी त्यांना पोटदुखीच्या समस्या या जास्त जाणवत असतात . कारण त्या काळात मुलींच्या शरीरातील बदलत असलेले हार्मोन्स यामुळे मुलींना अशा समस्यांना सामोरे जावे लागते . पण प्रत्येक महिन्याला पोटदुखीची समस्या असेल तर अशा वेळी मेडिकल मधून गोळ्या खाऊन या त्रासापासून दूर राहण्याचा प्रयत्न मुली करतात . पण शरीरासाठी सतत गोळ्या या अजिबात योग्य नाहीत . त्यामुळे घरगुती उपायांना जास्त महत्व दिले गेले पाहिजे . त्यासाठी काय उपाय करू शकतो . याची माहिती घेऊया ….
महिलांना मासिक पाळीच्या काळात कंबरदुखी तसेच पोटदुखी याच्या समस्या या जास्त जाणवतात . त्यावेळी मात्र घरात बसून आराम करणे प्रत्येक स्त्रिला शक्य असतेच असे नाही . त्यामुळे याच्यापासून दूर राहायचे असेल तर अशा वेळी आहारात रताळे याचा समावेश केला जावा. त्यामुळे पोटदुखी हि दूर राहू शकते . रताळ्यामधील असलेले अँटिऑक्सिमॅटिक गुण हे वेदना सहन करण्यास मदत करतात . महिलांच्या शरीरात जर व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर सुद्धा कंबरदुखी वाढते . त्यामुळे आहारात दूध आणि दुधजन्य पदार्थांचा समावेश हा करावा . मासिक पाळी हि येण्याअगोदर काही दिवस दररोज सकाळ आणि संध्याकाळ बदाम हे भिजवून खा. त्यामुळे शक्ती मिळते . तसेच झोपण्यापूर्वी काही दिवस अगोदर सब्जा हे पाण्यात टाकून प्या . त्याने पोटदुखी हि दूर होते .
मासिक पाळीच्या तारखेअगोदर काही दिवस आणि तारखेनंतर काही दिवस दररोज एक चमचा मेथीच्या बिया या पाण्यात टाकून त्याचा वापर हा पिण्यासाठी केला जावा. तसेच जर दररोज कमीत कमी ८ तास तरी झोप घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे असते . त्या काळात जास्त वेळ आराम करावा. म्हणजे जास्त त्रास हा होणार नाही.