घरातून माश्या घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या घरात छोट्या माश्या असतात. त्या माश्या आपल्या आरोग्यास हानिकारक असतात . त्यांच्यामुळे आपल्याला अनेक रोग आणि आजार यांना सामोरे जावे लागते . माश्यांमुळे अनेक रोग पसरले जातात. त्यांना नायनाट करणे हे आवश्यक आहे . घरात स्वच्छता जर कमी असेल तर त्यांचे साम्राज्य हे वाढतच जाते. अश्या वेळी घरातून माश्या काढण्यासाटी काही घरगुती उपायांचा वापर करण्याचा प्रयत्न करूयात ….
—- माश्यांच्या पायांवर, पंखांवर अनेक प्रकारचे बॅक्टेरीया असतात आणि याच माश्या आपल्या नकळत आपल्या अन्नावर किंवा हातावर बसतात तेव्हा त्यांच्या पायांवरचे आणि पंखांवरचे जीवाणू आपल्या हातावर किंवा अन्नावर येतात आणि मग त्याच हाताने आपण खाल्लं कि रोगराई पसरते. हे सर्वात घातक आहे .
— या माश्यांमुळे टायफॉईड, कॉलरा यासारखे भयानक रोग पसरतात त्यामुळे त्यांच्या आपल्या आजूबाजूला असण्याचा फार फरक आपल्याला पडत नसला तरी त्यांना घालवणं हे आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे.
—- यावर केमिकल्स, पेस्टीसाईड्स हे उपाय तर आहेतच, ते सोपे, पटकन होणारे किंवा सोयीस्कर ही असतील पण या दोन गोष्टींचे आपल्या आरोग्यावर पण विपरीत परिणाम होतात.
— अन्न नेहमी झाकूनच किंवा फ्रिजमधेच ठेवायचं. कधीतरी या माश्या फळांवर बसून सुद्धा अंडी घालू शकतात, खास करून पिकलेली केळी, चिकू यासारख्या मऊ फळांवर माश्या बसतात. त्यामुळे फळे नेहमी धुवून घ्यावीत .
— ओल्या कचऱ्याची रोजच्या रोज विल्हेवाट लावायची आणि इतर वेळेस तो नेहमी झाकूनच ठेवायचा.
— आपल्या घरातील पाणी उघड्यावर ठेवू नये .
— अन्न, ओला कचरा, घाण या सगळ्यामुळे माश्या येतात त्यामुळे घरात अशी घाण न ठेवता, शक्य तेवढी स्वच्छता राखली पाहिजे.
— संध्याकाळच्या वेळेस खूप प्रखर उजेडाचे दिवे लावू नयेत, त्या उजेडामुळे सुद्धा माश्या घरात शिरकाव करण्याची शक्यता असते.
— खिडक्यांना बाहेरून जाळी लावून घेतल्यावर माश्यांना घरात शिरता येणार नाही.
— अन्न नेहमी झाकूनच ठेवावे.
— घरातल्या कचरापेटीला घट्ट झाकण असेल तर चांगलं.
— खरकटी भांडी तशीच ठेऊ नयेत, वेळच्या वेळी भांडी घासून नाहीतर निदान ओली करून तरी ठेवावीत.