चेहऱ्यावरील नकोसे डाग होतील छूमंतर.. कसे?; लगेच जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। दैनंदिन जीवनशैली रोज थोडी थोडी बदलली तर कसं चालेल..? साहजिकच याचा परिणाम तुमच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेवर होतो. इतकेच काय तर चुकीची जीवनशैली तुमच्या सौंदर्यावरदेखील परिणाम करते. अनेकदा त्वचेवर नकोसे डाग आणि नकोसे केस व्याप्ती करतात. अशावेळी काय करावे ते सुचत नाही. मग महिला महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सवर खर्च करतात नाहीतर महागड्या केमिकल ट्रीटमेंट करतात. याचा परिणाम..? त्वचेचे आणखी नुकसान. मग चेहऱ्यावर येणारे डाग घालवण्यासाठी काय करायचे असा प्रश्न पडतो..? तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत.
जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग येत असतील, शिवाय मुरुमे, खड्डे, चट्टे यामुळे चेहरा खराब झाला असेल तर घरगुती फेसपॅकचा वापर करा. कारण सुंदरता देण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपाय अधिक प्रभावी असतात. हे फेसपॅक बनविणे आणि वापरणे अगदी सोप्पे आहे. त्याचबद्दल आपण जाऊन घेऊ खालीलप्रमाणे:-
फेसपॅक 1
० साहित्य – ५ ते ६ बदाम, १ चमचा मध, लिंबाच्या रसाचे काही थेंब, १/२ चमचा दूध.
० कृती – रात्रभर बदाम पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी भिजलेल्या बदामाची पेस्ट बनवून यात दूध घाला. नंतर यात इतर साहित्य मिसळून चेहऱ्यावर डाग असलेल्या भागावर लावा. हा उपाय रात्री झोपण्याआधी करावा.
० वापर – हे मिश्रण रात्रभर चेहऱ्यावर राहू द्या. सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. नंतर २ आठवडे नियमित रात्री झोपण्याआधी हा उपाय करा.
० फायदा – या फेसपॅकच्या वापराने चेहऱ्याचे सौंदर्य खराब करणाऱ्या डागांपासून सुटका मिळेल.
फेसपॅक 2
० साहित्य – मध्यम संत्र्याचे पूर्ण साल, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा दूध, १ चमचा मध.
० कृती – सर्वात आधी संत्र्याचं साल उन्हात सुकवून त्याची बारीक पावडर करा आणि यामध्ये वरील साहित्य मिसळा. यानंतर चेहऱ्यावरील प्रभावित जागी लावा.
० वापर – हा फेसपॅक जवळपास २० मिनिटं चेहऱ्यावर राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून ३ ते ४ वेळा करा.
० फायदा – मुरूम आणि पिगमेंटेशन दूर करण्यासाठी हा जलद परिणामकारक उपाय आहे.
फेसपॅक 3
० साहित्य – १ कच्चा बटाटा, पाणी.
० कृती – कच्चा बटाटा अर्धा कापून घ्या. त्यावर पाण्याचे काही थेंब घ्या.
० वापर – हा बटाटा प्रभावित त्वचेवर लावून १० मिनिटे चेहरा सुकू द्या. यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका.
० फायदा – त्वचेवरील डाग घालवण्यासाठी आठवड्यातून ३ ते ४ वेळा याचा वापर करा.