kidney

कळत नकळत कशा प्रकारे किडनीला आपण हानी पोहचवतो ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीराच्या विकासासाठी आणि वाढीसाठी शरीराचा प्रत्येक अवयव या व्यवस्थित असणे आवश्यक आहे . पण दररोज च्या कामकाजात आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही . त्यामुळे कळत ,नकळत आपल्या आरोग्यावर आणि किडनीवर आपल्या सवयीचा परिणाम हा होत असतो. सवयी जर चांगल्या असतील तर लगेच समस्या या जाणवत नाहीत . पण कालांतराने त्याचा ज्यावेळी आरोग्यावर परिणाम होतो .अशा वेळी समस्या या वाढत जातात.

प्रोटीनचे अतिरिक्त सेवन—

निरोगी आहारासाठी प्रोटिन्स आवश्यक आहे . पण त्याचा वापर हा जास्त असू नये . जर प्रोटीन आहारात जास्त असेल अशा वेळी किडनी आणि मूत्रपिंड हे आपले काम व्यवस्थित करत नाहीत . जास्त प्रोटिन्सयुक्त पदार्थ घेणे हे शरीराला हानिकारक असू शकते . असे पदार्थ आपल्या शरीराला इजा पोहचवू शकते.

आहारात असलेले मीठ —

आपल्या आहारातील पदार्थाना फक्त मीठानेच चव येते. मीठ असणे खूप आवश्यक आहे .जास्त प्रमाणातील मिठाचे सेवन हे रक्तदाब वाढवते सतत जर रक्तदाब वाढत राहिला तर त्यामुळे  किडनी निकामी होण्याची देखील शक्यता असते . तसेच जास्त मिठाच्या सेवनाने मुतखडा म्हणजेच किडनीस्टोन होण्याची देखील शक्यता असते . त्यामुळे किडनीच्या समस्या वाढून मूत्राशयाच्या सुद्धा समस्या या वाढत असतात .

 धूम्रपान—

आपल्या शरीराला धूम्रपान अजिबात योग्य नाही. धूम्रपान जर जास्त असेल तर आपल्याला कदाचित मधुमेह २ टाइप चा आजार होऊ शकतो. त्यामुळे किडनीविषयी समस्या या वाढू शकतात. त्यामुळे धूम्रपान सोडणे कधीही योग्यच राहील .

मद्यपान—

अनेक लोकांना मद्यपानाची सवय असते. त्यामुळे हृदयाच्या च्या समस्या या वाढत असतात . त्यांच्या शरीरात किडनीविषयक आजार होण्याची दाट शक्यता असते . हे अल्कोहोल आपल्या हृदयाला पोखरून काढत असते . त्याची क्षमता कमी करत असते . त्यामुळे अल्कोहोल सेवन न केलेलं बरे .

सोडा किंवा सोडायुक्त पेयं——-

जर तुमच्या आहारात नेहमी बाहेरच्या खाद्यपदार्थांचा समावेश होत असेल तर अश्या वेळी मात्र लघवीच्या समस्या या वाढत जातात. आनंद म्हणून अनेक जण सॉफ्ट ड्रिंक्स घेत असतात . रोज डाएट सोडा पिणाऱ्या महिलेच्या किडनी २० वर्षानंतर इतर महिलांच्या तुलनेत ३० टक्के कमी कार्यरत होती.

कमी पाणी पिणे —-

किडनीला तिचे कार्य हे व्यवस्थित राहण्यासाठी पाण्याची योग्य पातळी असणे गरजेचे आहे . जर तुम्ही पाणी पीत नसाल तर किडनीला तिचे कार्य करणे अवघड जाते . लघवी हि होण्यास त्रास हा होऊ शकतो. लघवी हि फिकट पिवळसर रंगाची असावी जर ती गडद पिवळ्या रंगाची असेल तर तुम्ही कमी पाणी पीत आहात असे समजावे

 अति व्यायाम— 

अति प्रमाणातील व्यायाम हा देखील किडनीवर परिणाम करू शकतो त्यामुळे व्यायाम करताना देखील अतिशयोक्ती करू नये लोकांच्या सल्याने व्यायाम न करता . तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करा .