मुतखडा कसा तयार होतो आणि त्याच्यावर असलेले उपचार कोणते ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । मुतखडा तयार होतो कारण जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता कमी असेल तर त्यामुळे या समस्या निर्माण होऊ शकतात . मुतखडा झाल्याने कोणतेच जेवण व्यवस्थित होत नाही . तसेच सतत पोटात दुखण्याच्या समस्या या निर्माण होतात. अश्या वेळी त्यावर उपचार करणे हे जास्त गरजेचे आहे . घरगुती उपचारांच्या द्वारे सुद्धा मुतखडा हा दूर करू शकतो. जर मुतखडा यांचे प्रमाण हे जास्त असेल तर मात्र जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. मुळे किडनी स्टोन्स म्हणजेच मुतखडा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. मुतखडा म्हणजे काय असा प्रश्न रूग्णांना अन् सर्वसामान्यांच्या मनात असतो. त्याविषयी…
मुतखडा म्हणजे ?
मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन्स होणं. ही अतिशय सामान्य प्रक्रिया आहे. पण ती अतिशय त्रासदायकही असते. त्यामुळे किडनीला आणि पर्यायाने आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मुतखडा हा लघवीमधून वेगळ्या होणाऱ्या कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम ऑक्झॅलेटसारख्या विशिष्ट क्षारांच्या स्फटीक कणांपासून बनलेले कडक पदार्थ असतात.
कसे होतात मुतखडे ?
लघवीमधील कॅल्शियम इ. सारख्या खडे बनविणाऱ्या विशिष्ट केमिकल्सची तीव्रता वाढण्यामुळे होतात. हे खडे मूत्रपिंडामधून रेटर्सकडे सरकतात. हे खडे लघवीच्या मुक्त प्रवाहामध्ये अडथळा आणू शकतात, ज्यामुळे पोटात फार दुखतं. हे खडे मूत्राच्या मार्गामध्ये मूत्रपिंडापासून युरेथ्रापर्यंत कुठेही असू शकतात. पण साधारणपणे मुत्रपिंड आणि युरेटरमध्ये असतात. अनेक घटकांमुळे मुतखडा होण्याची जोखीम वाढू शकते. मुतखड्यांचा कुटुंबातील इतिहास, पुरेसे द्रवपदार्थ न पिणं आणि जलशुष्कता गरम आणि दमट वातावरणामध्ये राहणारे लोक शरीरातून पाणी मोठ्या प्रमाणावर जाण्यामुळे, लघवीमध्ये कॅल्शिअम, फॉस्फेट, ऑक्झॅलेट इ. सारख्या केमिकल्सचं प्रमाण जास्त असणं. त्यासाठी मांसाहार पदार्थ आहारात घेऊ नका .
— उपाय
— मूतखडा होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे पाणी कमी प्रमाणात सेवन करणे, त्यामूळे दिवसातून कमीतकमी ४- ५ लीटर पाणी सेवन करण्याचे उद्दिष्ट ठेवावे.
— सकाळी उठल्याबरोबर जास्तीतजास्त प्रमाणात पाणी प्यावे.
— टोमॅटो, पालक, दूध, दुधाचे पदार्थ वर्ज्य केल्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.
— जास्त कालावधीसाठी लघवी रोखून धरू नये.
— ताकदीचा व्यायाम वर्ज्य करावा.
— ड जीवनसत्वाची पूरक मात्रा वर्ज्य करावी.
— सातूच्या पाण्याचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो.