wedding

लग्नाच्या दिवशी मुलीने स्वतःची कशी घ्यावी काळजी ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  लग्नाच्या काही दिवस अगोदर मुलीच्या आणि मुलांच्या घरी अनेक वेगवेगळे कार्यक्रम असतात . त्यामुळे सगळ्या कार्यक्रमांना हजेरी  लावावी लागते. मुलींसाठी सासर म्हणजे नवीन घर असते . त्यांच्या चाली, रूढी , प्रथा आणि परंपरा यानुसार अनेक गोष्टी या कराव्या लागतात. त्यामुळे नवऱ्या मुलींला स्वतःसाठी वेळ देता येत नाही . तसेच खाण्या – पिण्याच्या सवयी मात्र या खूप बदललेल्या असतात . म्हणून कदाचित अशक्तपणा येऊ शकतो. किंवा आजारी पडू शकता . त्यामुळे त्यापूर्वी काळजी घेणे खूप गरजेचेच आहे. त्यासाठी आपले  खाणे पिणे योग्य वेळेत असणे फार  गरजेचे आहे .

अनेक ठिकाणी लग्नाच्या दिवशी नवरा आणि नवरी यांना उपवास पकडण्याची प्रथा आहे . त्यामुळे त्या काळात अजून अशक्तपणा या जास्त जाणवू शकतो. म्हणून आपल्या जवळ एखादी थंड पाण्याची बाटली ठेवणे हे जास्त गरजेचे आहे . तसेच ज्यावेळी वेळ मिळेल त्या वेळी काही ना काही पदार्थ तोंडात टाकून चघळले गेले पाहिजेत . त्यामुळे एनर्जी हि अजून निर्माण होते . पाणी किंवा ग्लुकोज हे आपल्या सोबत ठेवले पाहिजे .

जर नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी यांना एकाद्या विधीपासून जर त्रास होत असेल तर असे विधी करणे टाळले गेले पाहिजेत . तसेच खूप वेळ उभे राहणे हे टाळले गेले पाहिजे . त्यामुळे पायांच्या समस्या या निर्माण होऊ शकतात. उंच चपला वापरणे टाळा . त्यामुळे पायाच्या टाचा हा जास्त दुखतात. काही दिवसांपासून असलेली धावपळ हे सहन नाही झालेनंतर चक्कर वैगेरे येण्याचे चान्सेस हे जास्त असतात . त्यामुळे कितीही घाई असली तरी खाणे टाळू नका. मुलींना तर लग्नाच्या दिवशी खूप पेशन्स ठेवावे लागतात . त्यामुळे मुलींनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे .