पावसाळी दिवसात मधुमेहाच्या रुग्णांनी पायांची काळजी कशी घ्यावी?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। तसे पहाल तर पावसाळा ऋतू अनेकांचा आवडता ऋतू आहे. मात्र याच दिवसात आपल्याला आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. विशेष करून ज्यांना मधुमेहाचा आजार असतो त्यांना अधिक काळजी घ्यावी लागते. कारण अश्या रुग्णांच्या पायाला एखादी दुखापत झाली तर ती लवकर बरी होत नाही. यासाठी पावसाळ्यात मधुमेहींनी आपल्या पायाला किंचितही दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी.
पावसाळ्यात पाय बराच वेळ भिजलेले अर्थात ओले राहील्यामुळे तळव्याला इनफेक्शन होण्याची दाट शक्यता असते. ज्याचे पुढे जाऊन गंभीर परिणाम होतात. या शिवाय पावसाळ्यात घाम, ओलावा, बुरशी आणि अन्य सुक्ष्मजीवांसाठी पोषक वातावरण असते. ज्याचा मधुमेहींना नक्कीच त्रास होऊ शकतो. म्हणून आपण आज काही अश्या टीप्स जाणून घेणार आहोत ज्या पावसाळी दिवसात मधू मेहींसाठी चला तर जाणून घेऊयात, मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी विशेष करून पावसाळ्यात आपल्या पायांची काळजी कशी घ्यावी.
१) पावसाळ्यात योग्य चप्पल अथवा शूजचा वापर करावा. ज्यामुळे पायांना जखम वा इनफेक्शन होणार नाही.
२) मधुमेहींसाठी काही खास फुटवेअर बाजारात मिळतात, शक्यतो या रुग्णांनी त्याचाच वापर करावा.
३) तुमच्या मापाचेच फुटवेअर वापरा शिवाय फुटवेअर अत्याधिक आराम देणारे असतील तर उत्तमच.
४) पावसात भिजल्यावर घरी गेल्याक्षणी आधी पाय स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर थोड्या कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पाय ठेवा आणि पाय निर्जंतूक करा.
५) पावसामुळे तुमचे पाय ओले झाले असता घरी अथवा ऑफिसमध्ये गेल्यावर पाय लगेच कोरडे करा.
६) गरजेपेक्षा जास्त आहार घेऊ नका. आहारावर नियंत्रण ठेवा. ज्यामुळे रक्तातील साखर प्रमाणात राहील.
७) पावसामुळे पायांना किंवा तळव्यांना खाज येत असेल तर नखे लावून तो भाग अजिबात खाजवू नका. उलट मॉस्चरायजर लावा म्हणजे आराम मिळेल.
८) मधुमेहींनी औषधे घेण्याचा कंटाळा करू नये. कारण त्यामुळे जखमा चिघळण्याची शक्यता वाढते.
९) पावसाळ्यात जखम टाळण्यासाठी मधुमेहींनी नियमित नखे कापावीत. कारण नखांमध्ये माती, दूषित पाणी आणि चिखल साचल्यास इनफेक्शनचा धोका असतो.
१०) त्वचा कोरडी किंवा रूक्ष असेल तर त्वचेवर नियमित नारळाचे वा बदामाचे तेल लावा. ज्यामुळे त्वचेला सतत खाज येणार नाही.
११) पायांची काळजी घेण्यासाठी मधुमेहींनी पेडीक्युअर करणे लाभ देते.
१२) सतत पायांना घाम येऊन पाय ओले होत असतील तर घरच्या घरी कोमट पाणी आणि पेडीक्युअर साधनांचा वापर करून पाय स्वच्छ करावे.
१३) पायांना एखादी जखम झाल्यास ती वाढत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
१४) मधुमेहींनी नेहमी रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवावेत आणि ते कोरडे करून त्याला मॉश्चराईझर लावावे.
१५) रात्री झोपताना पायामध्ये पातळ मोजे घालून झोपावे.
१६) पाय स्वच्छ करताना पावलाच्या बोटांच्यामधील खाचादेखील कोरड्या करा. कारण बोटांच्यामध्ये पाणी साठून तो भाग अस्वच्छ झाल्यानेही इनफेक्शन होते.
१७) चालताना ठेच लागणे, धडपडणे, खरचटणे अशा गोष्टी धोकादायक असतात. यासाठी पावसात फिरताना, चालताना या गोष्टींची काळजी घ्या.
१८) पायात काटा घुसणे, भोवरी होणे अशा समस्या झाल्यास त्यावर डॉक्टरांच्या सल्लाने उपाय करा. स्वतः पिन, सुई अशा टोकदार वस्तू वापरून स्वतःच उपचार करण्याचा प्रयत्न करू नका.
१९) एखाद्या किरकोळ दुखापतीकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. कधी कधी अशा छोट्या दुखापतीच गॅंगरिनसारख्या गंभीर समस्यांचे कारण होतात.
२०) नियमित पायाची देखभाल आणि चेकअप जरूर करा.