कोणत्याही हानीशिवाय अस्वच्छ नखे कशी स्वच्छ करालं?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन| आपली नखे आपल्या आरोग्याचा एक भाग आहेत. मात्र तरीही सुंदरता या एकमेव कॅटेगरीत त्याची मोड केली जाते. स्त्रिया आपल्या नखांची काळजी घेतात मात्र फक्त ती सुंदर दिसावी आणि चारचौघात आकर्षक वाटावी म्हणून. पण नखे फक्त सुंदर दिसावी म्हणून काळजी घेऊ नका. तर आपले आरोग्य उत्तम आणि सुदृढ राहावे म्हणून नखांची काळजी घ्या. वाढते प्रदूषण, धूळ, माती याचा जसा आपल्या केसांवर आणि त्वचेवर परिणाम होतो. अगदी तसाच याचा परिणाम आपल्या नखांवर देखील होत असतो. त्यामुळे आपल्या नखांची काळजी घेणे देखील जबाबदारीचे आणि आवश्यकतेचे काम आहे.
आजकाल नखं वाढवणे, नखांना विविध प्रकारचे आकार देणे, नखांवर टॅटू करणे, नखांवर नखं चिकटवणे असे बरेच प्रकार केले जातात. यांपैकी एकही पर्याय हा आरोग्यदायी नाही मात्र आवड, फॅशन आणि स्टाइलच्या नावावर म्हणून हे केले जातात. परिणामी नखांचे नुकसान आणि आरोग्याचा -हास. म्हणूनच आपल्या नखांची काळजी घेणं आपण या सगळ्यात कुठेतरी विसरून जातो. पण यामुळे विविध आजार अगदी सहज आपल्या शरीरात घर करू लागतात. एकतर नखांमध्ये घाण साठल्यास ती पोटात जाऊन पोटाचे विकार संभवतात. शिवाय एखादे नखं पोटात गेले तर आतड्यांना इजा होऊ शकते. वाढलेली नखं आपल्या स्वतःला वा इतर कुणालाही गंभीर जखम देऊ शकतात. म्हणून नखांची योग्य ती निगा राखायला शिका. नखे वेळीच स्वच्छ करा. कसे? ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
अशाप्रकारे तुम्ही तुमच्या नखांना कोणतीही हानी न पोहचवता नियमितपणे त्यांची योग्य निगा राखू शकाल. यामुळे नखांचे आरोग्य सुधारेल आणि व्यवस्थित राहील. याशिवाय नखांचे विकार होणार नाहीत आणि तुम्हाला हवी तशी त्यांची आकर्षकता टिकून राहील.