मिठाच्या वापराने कशी करावी प्रेग्नेंसी टेस्ट?; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
हॅलो आरोग्य ऑनलाईन। गर्भावस्था हि एक अशी स्थिती आहे जी प्रत्येक महिलेच्या आयुष्यात उत्साह आणि आनंद घेऊन येते. हा काळ प्रत्येक स्त्रीच्या अत्यंत जवळचा आणि भावभावनांशी संबंधित असतो. काहीतरी स्पेशल आणि खास असं आपल्या आयुष्यात घडतंय याची जाणीवच वेगळी असते. गर्भावस्थेतील प्रत्येक बारीक गोष्ट अनुभवण्यासाठी योग्य आहार, चांगली झोप, यथायोग्य सेक्स पोझिशन अश्या प्रत्येक गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. कारण ही खबरदारी घ्याल तरच हा आनंद जगण्याची संधी मिळते. सर्वसाधारणपणे मासिक पाळी न येणे हे प्रेग्नेंसीचे प्रमुख लक्षण आहे. पण प्रत्येकवेळी मासिक पाळी न येण्यामागेच हेच कारण असेल याची काही शक्यता नाही. यामुळे आजकाल बाजारात उपलब्ध असणारे प्रेग्नेंसी किट वापरून घरच्या घरी गर्भधारणा तपासली जाते. पण हे किट महाग असल्याने प्रत्येक महिलेला ते परवडेलच असे नाही. मग अश्यावेळी घरच्या घरी प्रेग्नेंसी टेस्ट कशी कराल?
तर मैत्रिणींनो, प्रेग्नेंसी किट शिवायदेखील तुम्ही घरच्या घरी गर्भधारणा मिठाच्या सहाय्याने वापरू शकता. होय. चला तर जाणून घेऊया मिठाच्या सहाय्याने प्रेग्नेंसी टेस्ट कशी कराल ते खालीलप्रमाणे:-
० घरच्याघरी प्रेग्नेंसी टेस्ट – घरच्या घरी प्रेग्नेंसी टेस्ट करणे एक घरगुती उपाय असून हा उपाय सुरक्षित आहे. पण जर घरात प्रेग्नेंसी किट उपलब्ध नसेल तर घरातल्या घरात गर्भधारणा तपासणी करण्यासाठी साखर, ब्लिच किंवा मिठाचा वापर करता येतो. या सर्व पद्धती एका सिद्धांतानुसार काम करत असून त्याने मुत्रातील एचसीजी हार्मोन्सच्या पातळीची चाचणी करता येते.
० मिठाच्या वापराने कशी करावी प्रेग्नेंसी टेस्ट? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
स्टेप १ – सकाळी सकाळी उठल्यानंतर एका बाटलीत पहिल्या लघवीचा सॅंपल घ्या.
स्टेप २ – त्यात तीन चतुर्थांश चमचे मीठ मिसळा.
स्टेप ३ – एक ते दोन मिनिटांनंतर लघवी आणि मीठ एकत्र आल्यावर होणारा परिणाम बघा.
स्टेप ४ – जर परिणाम सकारात्मक (+) असेल तर मिठासोबत लघवीतील एचसीजी हार्मोनची अभिक्रीया होऊन फेस निर्माण होतो.
स्टेप ५ – जर परिणाम नकारात्मक (-) असेल, म्हणजेच तुम्ही जर गरोदर नसाल तर मीठ लघवीतील हार्मोनसोबत कोणतीही प्रकिया करत नाही.
० मिठाच्या सहाय्याने प्रेग्नेंसी टेस्ट करण्याची योग्य वेळ कोणती?
– सामान्यत: ऑव्ह्युलेशनच्या (ओव्ह्युलेशन म्हणजे म्हणजे स्त्रियांमधील बीजांडकोश फुटून स्त्री बीज बाहेर येण्याची क्रिया) पाचव्या दिवशी प्रेग्नेंसी टेस्ट करावी. यासाठी पहिल्यापासूनच आपल्या ऑव्ह्युलेशन डेटचा ट्रॅक ठेवा.
० मिठाने केलेल्या तपासणीचा रिझल्ट अचूक मिळतो का?
– मिठाने केलेल्या चाचणीचा रिझल्ट हा अचूकच मिळतो. पण तरीही काही स्त्रियांना मिठापेक्षा अधिक प्रेग्नेंसी किटवर विश्वास असतो. पण मैत्रिणींनो प्रेग्नेंसी किटने केलेल्या चाचणीचा रिझल्टही अनेकदा चुकू शकतो. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन अल्ट्रासाऊंड हे करावंच लागतं.