कशा पद्धतीने सुंदर कराव्यात आयब्रो?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । प्रत्येकाला सुदंर दिसणे हे खूप महत्वाचे असते. सुंदर दिसण्यासाठी अनेक जणी वेगवेगळ्या टिप्स वापरतात. आपल्या चेहऱ्यावरचे सौदर्य हे अजिबात कमी झाले नाही पाहिजे यासाठी अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरले जातात. आपल्या चेहऱ्यावरच्या आयब्रोज सुद्धा सुदंर असणे गरजेचे असते . काळ्याभोर जर आयब्रो असतील तर तुमच्या सौदर्यात वाढच होते . म्हणून आयब्रो कश्या पद्धतीने मेंटेन करणे आवश्यक आहे . तसेच कोणत्या प्रकारचे साहित्य वापरणे सुद्धा गरजेचे आहे . ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …
ज्यावेळी तुम्ही संपूर्ण मेकअप करता , त्यावेळी तुम्हाला तुमच्या आयब्रोज कडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे . त्यामुळे आयब्रोज अजून खुलून दिसतात. ज्यावेळी तुम्ही संपूर्ण मेकअप करत असाल तर त्यावेळी प्रथम तुमच्या सर्व चेहऱ्याला प्रायमर लावून घ्या . तसेच प्रायमर लावताना तुमच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला आणि आयब्रोज च्या खालच्या बाजूने प्रायमर लावून घ्या . त्यामुळे चेहरा अजून खुलून दिसतो. जर डोळ्यांच्या खाली वर्तुळे असतील तर ती वर्तुळे न दिसण्याचे काम प्रायमर करत असते . त्याच्या वर कन्सिलर लावा म्हणजे तुमच्या डोळ्याच्या आजूबाजूचं भाग हा उठून दिसतो. कन्सिलर लावल्यानंतर तुम्ही स्पुली ब्रशच्या साहाय्याने आयब्रोज विंचरुन घ्या. त्यामुळे आयब्रोजचा आकार उत्तम येतो.
आयशॅडो पावडर किंवा आयशॅडोशी निगडीत तुमच्याकडे जे आहे ते स्ट्रोक लावून आयब्रोजला लावून घ्या. जर तुम्हाला आयब्रोजचा आकार वाकडा तिकडा होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही आधी आऊटलाईन काढून घ्या. त्यानंतर त्यामध्ये फिलिंग करायला घ्या. तसेच आयब्रोज जर तुमच्या काळ्या नसतील तर त्या काळ्या करून घ्या . त्यामुळे तुमच्या सौदर्यात वाढ होताना दिसते .