स्त्रियांच्या अंगावरून पांढरे जात असेल तर त्यावेळी कशी काळजी घ्यावी ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । महिलांच्या आरोग्यासाठी त्याच्या शरीराची योग्य पद्धतीने स्वच्छता असणे गरजेचे आहे. शरीराची स्वच्छता जर व्यवस्थित नसेल. तर त्यावेळी अंगावरून पांढरे जाण्याची समस्या हि निर्माण होऊ शकते.जे महिलांच्या शरीरावरुन जास्त प्रमाणात पांढरे जात असेल तर त्यावेळी कोणत्या प्रकारची लक्षणे दिसायला सुरुवात होते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …
— चक्कर येणं
— सतत अशक्तपण जाणवतो .
— शरीराला थकवा जाणवणं
— प्राइवेट पार्टमध्ये खाज येणं
— अस्वस्थ वाटणं
— प्राइवेट पार्टमधून दुर्गंधी येणं
— बद्धकोष्ट किंवा डोकेदुखी याचा त्रास हा जास्त प्रमाणात जाणवणे.
कश्या पद्धतीने काळजी घेणे अपेक्षित आहे ?
आपल्या शरीरातील व्हजायनाची काळजी घ्या. तसेच स्वच्छता राखा. यामुळे इन्फेक्शन पसरण्याची शक्यता कमी होते. मासिक पाळीमध्ये स्वच्छतेची काळजी घ्या.कमीत कमी पाच तासांनी सॅनिटरी पॅड चेजं करा. हलक्या गरम पाण्याने स्वच्छ करून, एखाद्या सुती कपड्याने प्रायव्हेट पार्टची स्वच्छता राखा. जर तुम्ही कापड वापरत असाल तर अश्या वेळी तुम्ही तो कपडा स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकलेला गेला पाहिजे. त्याने जंतुसंसर्ग हा जास्त प्रमाणात जाणवणार नाही. कॉटनच्या अंडरविअर वापरा. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी असतो. मासिक पाळीत जी कपडे वापरली गेली असतील ती कपडे डेटॉल च्या पाण्याच्या साह्याने स्वच्छ करा.