चेहऱ्यावर ब्लीच करताना ‘हि’ घ्या काळजी
हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते त्यामुळे प्रत्येकजण आपल्या चेहऱ्याची काळजी हि आपल्या परीने घेत असतो. अश्या वेळी प्रत्येक महिला या आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या ट्रीटमेंट या घेत असतात. त्यावेळी ब्लीच करणे असू किंवा इतर चेहऱ्याच्या काही वेगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंट असो . पण ज्यावेळी आपण घरगुती पद्धतीने ब्लीच करत असू तर त्यासाठी कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया ….
जर तुम्ही चेहऱ्यावर घरच्या घरी ब्लीच करणार असाल तर त्यासाठी तुम्ही काळजी कशी घेतली पाहिजे ते सांगणार आहोत. सामान्यपणे कोणत्या नऊ नऊ गोष्टींचा वापर किंवा टिप्स आपण केल्या गेल्या पाहिजेत ते जाणून घेणार आहोत…
— प्रथम आपला चेहरा हा साफ करून घ्या.
— चेहऱ्याला स्वच्छ आणि तजेल बनविण्यासाठी ब्लीच एक चांगला पर्याय आहे ब्लीच आपले अवांछित केस लपविण्यासह त्वचेमध्ये सोनेरी चमक आणते.
— ब्लीचचा वापर हात, पाय, पोटावर वेक्सचा पर्याय म्हणून केला जाऊ शकतो.
— लक्षात ठेवा की ब्लीचमध्ये अमोनियाचे प्रमाण दिलेल्या सूचनांनुसारच घाला. अमोनियाचे जास्त प्रमाण आपल्या चेहऱ्याला इजा करू शकतात.
— याचा वापर करताना हे लक्षात असू द्या की हे डोळ्यांचा वर लागायला नको नाहीतर हे आपल्यासाठी हानिकारक असू शकतो. चांगले हेच राहील की हे डोळ्यांवर किंवा भुवयांवर लावू नये.
— सध्या बाजारपेठेत ब्लीच बऱ्याच प्रकारांच्या कंपन्यांचे मिळतात, यांचा ट्रायल पॅकचा वापर आपण आपल्या त्वचेवर वापरू शकता.
— जे आपल्या त्वचेला सूट होईल अश्या पद्धतीचेच ब्लीच आपण वापरले गेले पाहिजे.
— डब्यावर दिलेल्या सूचनांनुसारच ब्लीच मध्ये अमोनिया पावडरचे प्रमाण घालावं.
— क्रीम आणि पावडरच्या मिश्रणाला आधी हाताच्या कोपऱ्याला किंवा इतर जागी लावून बघा.
— त्वचेवर जळजळ होत असल्यास मिश्रणात क्रीमाचे प्रमाण वाढवावं.
— नेहमीच चांगल्या ब्रँडेड कंपनीचे ब्लीच वापरावं.
— जर जळजळ जास्त प्रमाणात होत असेल तर मात्र अमोनिया चे प्रमाण हे कमी ठेवावे.
— तसेच ब्लीच हे जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नये.