गर्भनिरोधक गोळ्या घेताना कोणती काळजी घ्यावी ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक वेळा महिलांना गर्भ नको असले किंवा गर्भामध्ये काही प्रमाणात त्रुटी असतील अश्या वेळी महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात. अनेक वेळा गर्भनिरोधक गोळ्या घेण्यासाठो डॉक्टरांचा सल्ला हा घेतला जातो. गर्भनिरोधक गोळ्या घेताना पण जास्त प्रमाणात काळजी हि घेतली गेली पाहिजे. कारण चुकीच्या पद्धतीने गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या असता कदाचित गर्भ हा पुन्हा राहू शकतो.
गर्भनिरोधक गोळ्यांनी जवळपास हे ९९ टक्के गर्भ हा रोखला जाऊ शकते. काही वेळेत दिलेल्या कालावधीमध्ये जर गोळ्या खाणे विसरले तर मात्र गर्भधारणेच्या समस्या या जास्त प्रमाणत निर्माण होऊ शकतात. जर आपल्याला गर्भ नको असेल तर मात्र नियमित पणे गोळ्या या वेळेच्या वेळी खाल्या गेल्या पाहिजेत. गर्भनिरोधक गोळ्या या दोन प्रकारच्या असतात. एक प्रोटेस्टल गोळी आणि दुसरी म्हणजे गर्भनिरोधक गोळी . या गोळ्या कमीत कमी २१ दिवस तरी खाल्या गेल्या पाहिजेत . त्यामुळे महिलांना अनावश्यक असलेली गर्भधारणा होऊ शकणार नाही. सुरुवातीचे २१ दिवस गोळी खाल्यानंतर ७ दिवसानंतर या गोळ्या पूर्णपणे बंद केल्या जातात. जर या गोळ्या २४ तासांमध्ये एकदाही खाल्या नाही गेल्या तर मात्र आपल्याला गर्भधारणेची समस्या हि जास्त प्रमाणात जाणवू शकते.
जर महिलांना दोन तासांच्या नंतर जर गर्भनिरोधक गोळ्या खाल्यानंतर उलटी किंवा अतिसार यासारख्या समस्या जाणवल्या तर मात्र लक्षात घ्यावे कि , महिलांना त्याच्या गर्भधारणेवर परिणाम करणाऱ्या गोष्टी या होत नाहीत. त्याचा जन्म नियंत्रणात करणे मात्र फार अवघड होऊ शकते. जर तुम्ही दररोज च्या कालावधीमध्ये गर्भनिरोधक गोळ्या खात असाल तर त्या सूर्यप्रकाशापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा केला गेला पाहिजे. नाहीतर त्यातल्या अंशाची सूर्याबरोबर आणि प्रकाशाबरोबर साधारण रासायनिक क्रिया हि होऊ शकते. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात त्याचा प्रभाव पडावा असे वाटते तेवढ्या प्रमाणात त्याचा प्रभाव हा पडला जात नाही.