जेवणात भात आणि चपाती एकत्र खाल्ली तर..?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो आज आपण अश्या दोन पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत जे आपल्या दैनंदिन आहारात तर असतात पण तरीही याबाबत अनेकांना अनेक प्रश्न पडलेले असतात. हे पदार्थ म्हणजे भात आणि चपाती. हे दोन्ही पदार्थ आपण रोज आहारात खातो आणि ते महत्वाचेदेखील आहे. कारण या दोंहोच्या पदार्थांमध्ये आढळणारे घटक हे शरीरासाठी आवश्यक असतात.आपण आपल्या आवडीप्रमाणे लोणचे, पापड या सगळ्यांचा आहारात समावेश करतो. पण तुम्हाला कधी असं प्रश्न पडलाय का? कि जेवताना आधी चपाती आणि नंतर भात खाल्ला जातो. एखादा उपवासाचा दिवस सोडला तर आपणही असेच अन्न ग्रहण करतो. पण, प्रश्न असा आहे कि हे असे का? वा आधी चपाती आणि नंतर भात का? चपातीआधी भात का नको? वा भात आणि चपाती एकत्र खाल्ली तर..?तर काय होईल? असे अनेक प्रश्न आहेत ते कधीतरी तुम्हाला पडले आहेत का? जर याच उत्तर हो असेल तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नही उत्तरे देणार आहोत.
– काही लोक सांगतात की, भात आणि चपाती खाऊ नये. याचे कारण असे कि यामुळे खाल्लेला आहार पचत नाही. शिवाय आहारात संतुलन राहत नाही. पण आता हे कितपत योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
० जेवणात भात आणि चपाती एकत्र खाल्ली तर…,?
– जेवणात भात आणि चपाती एकत्र खाण्याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जातात. अनेक तज्ज्ञ हे बरोबर आहे असे सांगतात तर अनेक तज्ज्ञ शक्य असल्यास हे टाळले पाहिजे असे सांगतात. एका अहवालानुसार, तज्ञ सांगतात की, दोन्ही एकत्र खाण्यात काहीच अडचण नाही. कारण, दोन्ही समान धान्य आहेत आणि दोन्हीमध्ये कॅलरी जवळजवळ समान आहेत. अशा परिस्थितीत शरीराला ते पचवणे फारसे कठीण नसते.
– तर अन्य एका अहवालानुसार, दोन्ही धान्ये एकत्र करु नयेत. हे दोन पदार्थ पोटात जाण्यासाठी थोडे अंतर असले पाहिजे. कारण जेव्हा दोन्ही धान्य आतड्यात प्रवेश करतात तेव्हा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. तसेच दोन्ही धान्यांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने ते एकत्र ठेवल्यास शरीराला स्टार्च शोषण्यास मदत होते. परिणामी खाल्लेलं अन्न सहज पचत नाही आणि गॅसची समस्या होते. परंतु, असे खाल्ल्यास त्रास होत नसेल तर खाण्याची सवय बदलण्याची गरज नाही.
० चपाती खाण्याआधी आधी भात का खात नाही?
– असे म्हणतात कि, जेव्हा तुम्ही आधी भात खाता तेव्हा तुमचे पोट लवकर भरते आणि त्यानंतर चपाती खाणे शक्य होत नाही. म्हणूनच लोक आधी चपाती नंतर भात खातात. तसेच फक्त भात खाल्लयास पोट लगेच भरते पण काही वेळाने पुन्हा भूक लागते.