तळहाताला सतत घाम येत असेल तर ….
हॅलो आरोग्य ऑनलाईन । तळहात किंवा पायाला घाम येणे कि प्रक्रिया साधी आहे. पण तळहाताला घाम हा कोणत्याही ऋतूत किंवा कोणत्याही वेळेत येत असेल तर मात्र हि गोष्ट साधी नाही. कधी कधी जर हातापायाला जास्त प्रमाणात घाम येत असेल तर मात्र हि गोष्ट अनुवांशिक आहे असे मानले जाते. काही वेळा आपल्याला नर्व्हस वाटायला सुरुवात दिला. कधी तरी आपण गरम किंवा उबदार कपडे घालत्यानंतर सुद्धा आपल्याला हाता – पायाला घाम यायला सुरुवात होते. उन्हाळ्याच्या दिवसांत जर आपण लेदर चे कपडे वापरात असाल तर त्यावेळी सुद्धा आपल्या शरीराला घाम यायला सुरुवात होते.
अस्वच्छता —-
आपल्या आजूबाजूच्या परिसरात खूप अस्वच्छता असेल तर त्यावेळी शरीराला घाम येण्यास सुरुवात होते. आपण वापरत असलेले पायमोजे किंवा हातमोजे हे स्वच्छ नसले तर सुद्धा घाम येण्याची शक्यता जास्त असते. जर घामामुळे खराब झालेले बूट जर आपण उन्हात ठेवले नाहीत तर सुद्धा आपल्याला घाम येण्याची समस्या वाढत जाते.
हार्मोनल बदल —-
हार्मोनल च्या बदलामुळे आपल्या शरीरात खूप बदल होतात. मुला मुलींच्या शरीरात झालेल्या हार्मोनल्स च्या बदलामुळे सुद्धा शरीराला घाम येण्याचे प्रमाण वाढते.
कार्बोहायड्रेट्स चे आहारात प्रमाण —-
आहारात जर कार्बोहायड्रेस चे प्रमाण हे जास्त वाढत गेले तर मात्र आपल्याला घाम येण्याची शक्यता हि जास्त असते.आहारात प्रोटीन्स, फॅट आणि फायबर हे सगळे व्यवस्थित प्रमाणात घेतल्याने घाम येण्याचे प्रमाण कमी होते आणि घामाची दुर्गंधी सुद्धा येत नाही.
उपाय —-
बेकिंग सोडा —–
आपल्या शरीराला जर घाम जास्त असेल तर त्यावेळी काही प्रमाणात बदलीमध्ये पाणी घ्या. आणि त्या बादलीत थोड्या प्रमाणात बेकिंग सोडा टाका. १५ मिनिटे हे पाय त्या बादलीत टाकून ठेवा. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करा. त्यामुळे हाता – पायाला घाम येण्याचे प्रमाण हे कमी राहते. तसेच बेकिंग सोडा वापरल्याने आपल्या पायाला सुटणाऱ्या घामामधून विषाणू वाढत नाहीत. पायाची जी दुर्गंधी आहे. ती सुद्धा कमी होण्यास मदत होऊ शकते.
लव्हेंडर ऑइल —-
लव्हेंडर ऑइल चा सुवास हा खूप छान असतो. त्यामुळे बाहेर जाताना सुद्धा सुद्धा लव्हेंडर ऑइल चा वापर हा जास्त केला जातो. या ऑइल चे काही थेंब हे बादलीत टाका आणि त्या मध्ये पाय घालून कमीत कमी २० मिनिटे तरी बसा. त्यामुळे आपल्या पायाला येणार घाम हा कमी होऊ शकतो.
तुरटी —-
हाता पायाला जर घाम येण्याचे प्रमाण हे जास्त असेल तर त्यावेळी आपल्या हाताला किंवा पायाला जर घाम येत असेल तर त्यावेळी तुरटीचा वापर हा जास्त प्रमाणात केला हा जावा. त्यामुळे आपले पाय आणि हात स्वच्छ राहतील .