कोरोना व्हॅक्सिनेशन नंतर त्रास होत असेल, तर करा हे उपाय; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। गतवर्षापासून देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. शिवाय शासनाकडून कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु आहे. मुख्य म्हणजे कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हि लस घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण हि लस आपली प्रतिकारशक्ती वाढवतेच आणि कोरोनास रोख लावते.
अनेक लोकांना लस घेतल्यानंतर हात दुखणे, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, अशक्तपणा आणि थकवा असे काही दुष्परिणाम २ ते ३ दिवसांपर्यंत जाणवत आहेत. यामुळे अनेकजण लास घ्यायला घाबरत आहेत. तर मित्रहो आता घाबरण्याची गरज नाही. कारण, आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्याने हा त्रास कमी करण्यास मदत होते.
१) हिरव्या पालेभाज्या – हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, प्रो विटामिन ए, कॅरोटीनोईड्स, फोलेट, मॅंगनीज इत्यादी पोषक तत्वे असतात. हि सर्व पोषकतत्वे शरीरातील चयापचय क्रिया सुव्यवस्थित ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. शिवाय शारीरिक थकवा दूर करण्यासदेखील मदत करतात. यामुळे लसीकरणानंतर हिरव्या पालेभाज्यांचे सेवन हा एक उत्तम पर्याय आहे.
२) आले – आल्यामुळे पदार्थांमध्ये एक विशिष्ट चव येतेच पण त्याचे अनेको औषधी गुणधर्म शरीरासाठी लाभदायक असतात. आल्यामध्ये अमीनो ऍसिड्स आणि एन्झाईमन समाविष्ट असते. जे आपल्याला तणावातून मुक्त करते आणि मनशांती देते.
३) हळद – हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, एंटी-इंफ्लेमेटरी, एनाल्जेसिक आणि एंटी-फंगल गुणधर्मांचे संतुलन समाविष्ट असते. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती सहज मजबूत होते. त्यामुळे लस घेतल्यानंतर हळदीचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे अंगदुखी आणि वेदना कमी होतात. शिवाय शारीरिक ताण आणि थकवा जाणवत नाही.
४) पाणी – पाण्याचे सेवन हे अनेको आजारांवरील रामबाण उपाय आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतरदेखील दररोज भरपूर पाणी प्यावे. यामुळे लसीकरणानंतर शरीरावर वाईट परिणाम करणारे जबाबदार घटक शरीराबाहेर आपसूकच फेकले जातात.
५) हायड्रेटेड पदार्थ – लसीकरणानंतर शरीराला हायड्रेटेड ठेवतील अश्याच पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर आहे. त्यासाठी लसीकरणानंतर आपल्या आहारात संत्री, खरबूज, काकडी या पदार्थांचा प्रामुख्याने समावेश करा.