आंघोळीच्या पाण्यात ‘या’ गोष्टी मिसळालं तर आरसाही तुमच्या प्रेमात पडेल; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुंदर कुणाला दिसायचं नसत? या जगात प्रत्येकालाच सुंदर दिसायचं स्वातंत्र्य आणि हक्क आहे. यासाठी आपली त्वचा सुंदर, मुलायम, कोमल आणि तेजस्वी असणे गरजेचे आहे. यासाठी फार काही खर्च आणि वेळ देण्याची गरज नाही. आपल्या आंघोळीच्या पाण्यात आम्ही सांगू त्या गोष्टी मिसळा आणि अनुभवा सुंदर आणि तेजस्वी त्वचा. या गोष्टी कोणत्या आणि त्यांचा कसा वापर करायचा ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) फुलांच्या पाकळ्या – फुलांच्या पाकळ्या आंघोळीच्या पाण्यात मिसळल्यास त्वचा तेजस्वी होते. यासाठी विशेषतः गुलाब आणि लव्हेंडर या फुलांचा वापर केला जातो. यामुळे केवळ त्वचा नव्हे तर मेंदूलाही आराम मिळतो.
२) सायट्रस – लिंबू, मोसंबी, संत्री, द्राक्ष या फळांचे लहान लहान तुकडे अथवा सालं काढून आंघोळ करण्याच्या पाण्यात टाका. असेच १०-१५ मिनिट हे पाणी ठेवून द्या आणि यानंतर त्या पाण्याने आंघोळ करा. या फळांतील विटामिन सीमुळे त्वचेला अधिक तजेलदारपणा मिळतो.
३) दालिचिनी – दालिचिनीमुळे तुमची त्वचा केवळ मुलायमच होते असं नाही तर आंघोळीचं पाणीही अधिक अरोमॅटिक बनविण्यास याचा उपयोग होतो. यामुळे दिवसभर अंगाला चांगला सुगंध येत राहतो.
४) ओट्स – आपली त्वचा कोरडी असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडे ओट्स घाला आणि ते फुगल्यावर अंगाला स्क्रब करा. यामुळे त्वचा अधिक चांगली होते आणि ओट्समुळे त्वचेला मुलायमपणा मिळतो.
५) आले – सांधेदुखीचा त्रास असेल आंघोळीच्या पाण्यामध्ये आल्याचा किस मिसळा आणि या पाण्याने आंघोळ करा. यामुळे त्वचा तजेलदार होईलच आणि सांधेदुखीचा त्रास कुठच्या कुठे पळून जाईल.
६) मध आणि लिंबू – मध आणि लिंबू त्वचेला अधिक चांगला परिणाम देतात. यामुळे आंघोळीच्या पाण्यात मध आणि लिंबाची सालं टाकून स्क्रब बाथ तयार करा. लिंबाचे साल अंगावर रडगा यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि मधामुळे त्वचेला मऊपणा मिळेल. नंतर दुसऱ्या पाण्याने पुन्हा आंघोळ करून मधाचा चिकटपणा घालवून टाका.
७) दूध – दुधातील लॅक्टिक अॅसिड हे त्वचेसाठी उत्तम ठरते. यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी दूध हा उत्तम पर्याय आहे. यासाठी आंघोळीच्या आधी १५ मिनिट चेहरा, मान आणि हाताला वाटीभर दूध लावा आणि मग आंघोळ करा. काही दिवसातच तुम्हाला त्वचेमध्ये फरक दिसेल.
८) ऑलिव्ह ऑईल – आंघोळीच्या पाण्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि या पाण्याने अंघोळ करा. यामुळे त्वचेला हायड्रेट होण्यासाठी मदत होईल.