कानातून पिवळे पाणी येत असेल तर वेळीच सावध व्हा! जाणून घ्या कारणे, परिणाम आणि उपचार
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकालच्या बदलत्या जीवन शैलीनुसार आरोग्याशी संबंधित अनेक आजार विविध रूपाने समोर येत असतात. त्यात कानातून पिवळे पाणी येणे हि देखील एक आरोग्याशी संबंधित समस्या आहे. दिसताना अगदी सामान्य वाटणारी समस्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही हे आधी समजून घ्या. कारण वेळीच उपचार न झाल्यास ह्या समस्येचे स्वरूप गंभीर आजारांत होऊ शकते. यामूळे बहिरेपणादेखील येऊ शकतो. चला तर जाणून घेऊया कानातून पिवळे पाणी येण्याचे कारण, परिणाम आणि उपचार
० कारणे –
१) बॅक्टेरिया, वायरस आणि फंगल इन्फेक्शनमूळे कानातून पिवळे पाणी येण्याची अधिक शक्यता आहे.
२) सर्दी होणे, खोकला, टॉन्सिल्स, सायनस यांमुळेसुद्धा नाक आणि घशातील बॅक्टेरिया आणि वायरस हे कानात प्रवेश करून तेथे इन्फेक्शन तयार करतात. या इन्फेक्शनमुळे कानातून पिवळे पाणी येते.
३) कानाच्या बाह्यभागात जखम झाली असेल तरीही कानातून पिवळे पाणी येऊ शकते.
४) कानात काडी, पेन्सिल इ. तत्सम वस्तू घालण्याच्या सवयीमुळे कानाच्या आतवर न दिसणाऱ्या जखमा झाल्याने कानातून पिवळे पाणी येऊ लागते.
५) कानातील मळ काढण्यासाठी टोकेरी वस्तू वापरल्याने कानाच्या पडद्याला इजा होऊन कानातून पिवळे पाणी येते.
६) वायू प्रदूषण, धुळीची एलर्जी यामुळे देखील कानातून पिवळे पाणी येते.
० परिणाम –
१) कानातून पिवळे पाणी, पू यांसारखे स्त्राव येत असतील किंवा अचानक कानात कळा, कानदुखी होत असेल तर याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. परिणामी बहिरेपण येऊ शकते.
२) कानातून पिवळे पाणी येत असेल तर हे एक प्रकारचे इन्फेक्शन असू शकते. हे कानातील इन्फेक्शन मेंदूत पसरल्यास त्याला सूज येणे, चक्कर येणे, मेंदूज्वर असे गंभीर विकार उद्भवतात.
३) जर हि समस्या अत्यंत गंभीर होईपर्यंत दुर्लक्षित केली, तर कानाची सर्जरीही केली जाऊ शकते.
० उपचार –
१) कानातून पिवळे पाणी येत असेल तर जास्तीत जास्त पाणी प्या.
२) घरगुती उपचार म्हणून अँटिबायोटिक्स घेऊ नका.
३) सर्दी, खोकला तसेच टॉन्सिल्सच्या तक्रारी टाळण्यासाठी थंडगार पदार्थ खाणे टाळा.
४) थंडगार एसीत बसू नका.
५) आंघोळ करताना पाणी कानात जाणार नाही याची काळजी घ्या.
६) आंघोळीनंतर कान कोरड्या फडक्याने पुसा.
७) कानात काडी, पेन्सिल यांसारख्या टोकेरी वस्तू घालणे टाळा.
८) वारंवार कान खाजवणे, कानात बोटं घालणे टाळा.
९) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानात कोणतेही औषध घालू नका.
१०) अत्यंत महत्वाचे, दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.