swollen face
|

नेहमी सकाळी उठल्या उठल्या तुमचा चेहरा सुजलेला दिसत असेल तर त्यावेळी कोणते उपाय करावेत ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । सकाळी उठल्या उठल्या आपला चेहरा हा सुजलेला दिसला तर त्यावेळी असे वाटते कि, आपल्याला कोणता तरी आजार आहे . पण याची कारणे हि वेगवेगळी असतात . जर रात्रीचे जास्त वेळ जागरण झाले तर किंवा जर जास्त प्रमाणात मद्यपान केले असल्यास , ज्यादा ताण-तणाव, थकवा ,कामाचे प्रेशर असेल तर रात्रीची झोप हि पूर्ण होत नाही. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या तुमचा चेहरा हा खूप सुजलेला दिसून येतो. त्यावर काय उपाय आहेत, ते जाणून घेऊया ….

— सकाळी चेहऱ्यावरची सूज कमी करण्यासाठी उठल्या उठल्या थंड पाण्याने चेहरा हा साफ करा. चेहऱ्यावर रात्रीचे जे पोअर्स ओपन झालेले असतात. ते थंड पाण्याने भरून निघण्यास मदत होऊ शकते. जे ओपन पोअर्स असतात. ते घट्ट होतात. आणि त्यामुळे सूज हि कमी कमी होण्यास मदत होते.

—- सकाळी उठल्या उठल्या एखादा सुती कापड घ्या. त्यामध्ये काही प्रमणात्य बर्फ टाका. तो बर्फ हा आपल्या चेहऱ्यावर लावा. त्याने सूज हि कमी होण्यास सुरुवात होऊ शकते.

— सकाळी उठल्या उठल्या आपल्या हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर मालिश करा. म्हणजे सूज हि कमी प्रमाणात राहते. मालिश करताना बदामाच्या तेलाचं वापर हा केला जावा. मालिश मुळे रक्ताभिसरण क्रिया हि व्यवस्थित होण्यास मदत होऊ शकते.

— सकाळी घाम येईपर्यंत व्यायाम करा. त्यामुळे त्वचेवरील टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होऊ शकते.

— चेहऱ्यावर सूज येऊ नये म्हणून आपल्या शरीरात जास्त पाण्याचा वापर करा. सकाळी उठल्या उठल्या लघवीला जावे.