खूप दिवसानंतर व्यायाम करत असाल तर हे नियम जरूर पाळा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे हि आपली जबाबदारी आहे. कारण सुदृढ आरोग्य निरोगी जीवनाचे रहस्य आहे. यासाठी आपल्या दररोजच्या दिनचर्येत काही महत्वाचे बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. जसे खाण्या पिण्याच्या वेळा आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्यायाम. होय. कित्येक जणांचा दररोज व्यायाम करणे कंटाळवाणे वाटते. मात्र, योग्य पद्धतीने केला जाणारा व्यायाम तुमच्या शरीरासोबत त्वचेच्या आरोग्याचीही काळजी घेण्यास सक्षम आहे हे फार कमी लोक जाणतात.
व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. जसे कि नियमित व्यायाम केल्यामूळे आरोग्य उत्तम राहते. तसेच शरीर तंदुरुस्त राहते आणि रोग प्रतिकार शक्तीत वाढ होते. परिणामी कित्येक आजार आपल्यापासून दूर राहतात. तसे पहाल तर अनेकजण फिटनेसबाबत अतिशय सक्रिय असतात. तर काहीजण आळशी असतात. त्यामुळे अनेकदा चार दिवस व्यायाम करून हे लोक मध्येच व्यायाम करणे सोडून देतात आणि मग पुन्हा काही दिवसांनी व्यायाम सुरु करतात. पण यामुळे शरीराला अनेको त्रासांना सामोरे जावे लागते. जर तुम्हीदेखील अनेक दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा व्यायाम सुरू करणार असाल तर काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. हे नियम कोणते ते जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
१) व्यायामाची वेळ पाळा.
– अनेक जण उत्साहाच्या भरात खूप मोठ्या विश्रांतीनंतर व्यायाम सुरु करण्याच्या नादात व्यायामाची वेळ पाळत नाही. अगदी मिळेल त्या वेळेत केव्हाही व्यायाम करतात. याचा परिणाम थेट त्यांचं शरीरावर होती. अगदी काही दिवसांतच त्यांना त्रास सुरू होतो. मग पुन्हा व्यायाम न करण्यासाठी त्यांना जणू एक कारणच मिळतं. त्यामुळे व्यायामाचं एक वेळापत्रक तयार करा आणि ठरलेल्या वेळात नियमित व्यायाम करा.
२) सुरुवातीला योगासने करा.
– अनेक दिवसांच्या ब्रेकनंतर व्यायाम सुरू करताना आधी योगसनं करण्यापासून सुरुवात करा. कारण सुरुवातीलाच अवघड व्यायाम करायला गेल्यास शारीरिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३) सकाळची ५ मिनिटे अत्यंत महत्वाची.
– योगासनं न करता व्यायाम करण्यास सुरुवात केल्यामूळे लवकर थकवा येतो. त्यामुळे अनेक दिवसांच्या ब्रेकनंतर व्यायाम सुरु करताना दररोज सकाळी ५ मिनिटे व्यायाम करावा. यानंतर रोज हळूहळू व्यायामाची वेळ थोडी थोडी वाढवा.