बसल्याजागी झोपत असालं तर वेळीच व्हा सावध, अन्यथा …; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा प्रवासात आपण बसल्या बसल्या डुलकी घेतो. याशिवाय अनेकदा असेही होते कि अगदीच निवांत बसलेले असताना डोळ्यावर झोप येते आणि आपण आहोत त्याच जागी झोपून जातो. पण मित्रांनो हे बसल्या जागी झोपणे आरोग्याच्या दृष्टीने कितपत चांगले किंवा वाईट आहे याचा आपण कधी विचार केला आहे का? नाही ना? खर तर आपल्या झोपण्याची स्थिती हि आपली झोप आणि आरोग्य या दोहोंवर परिणाम करत असते. काही संशोधनांमध्ये असेही आढळून आले आहे कि बसल्याजागी झोपण्यामुळे मृत्यू ओढवला जाऊ शकतो. होय. मृत्यू. म्हणून आज आपण बसल्या जागी डुलकी घेण्याचे फायदे आणि अगदी तोटेसुद्धा जाणून घेणार आहोत. याशिवाय तज्ञ याबाबत काय सांगतात तेदेखील जाणून घेणार आहोत.
० बसल्याजागी डुलकी घेण्याचे फायदे –
१) ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप अॅपनियाच्या रूग्णांना श्वसनाचा त्रास होत नाही.
२) ज्यांना गॅस्ट्रोइंटेस्टायनल आणि पचनाची समस्या आहे त्यांना फायदेशीर आहे.
३) गर्भावस्थेत ही स्थिती आरामदायक वाटत असल्याने गर्भवती महिलांना हे लाभदायक आहे.
० बसल्या-बसल्या डुलकी घेण्याचे तोटे –
१) जास्तवेळ एकाच अवस्थेत झोपल्याने पाठदुखी आणि अंगदुखी होते.
२) कमी हालचाल आणि कमी ताण यामुळे सांधे आखडतात. परिणामी सांधेदुखीची समस्या उदभवते.
३) चुकीच्या पद्धतीत झोपल्याने मान दुखणे वा पोटात मुरडा पडण्याची समस्या जाणवते.
० बसल्याजागी झोपण्याने मृत्यू होण्याची शक्यता आहे का? काय सांगतात तज्ञ?
– तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मोठ्या कालावधीपर्यंत बसून राहिल्यास नसांमध्ये आकुंचन निर्माण होते. यामुळे विशेषता शरीराच्या खालच्या भागात म्हणजे पाय किंवा मांड्यांच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असतो. हे मोठ्या कालावधीवपर्यंत एकाच स्थितीत झोपल्यानेसुद्धा होऊ शकते. परंतु याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ही स्थिती घातक होऊ शकते. डीप वेन थ्रॉम्बोसिस (डीव्हीपी) ची काही सामान्य लक्षणे आहेत ज्यामुळे अचानक घोट्यात किंवा पायात वेदना, त्वचा काळी पडणे, घोटा आणि पायांना सूज, पायात पेटके येणे, त्वचा लाल होणे, त्वचेला वेदना होणे.