पार्टनरसोबत शारीरिक संबंधाची ओढ कमी झाली असेल, तर ह्या टिप्स जरूर वापरा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। एक स्त्री आणि पुरुष आपल्या आयुष्यात अतिशय सुंदर अशी एक गुंफण तेव्हा तयार करतात जेव्हा ते एकमेकांमध्ये कोणताही विचार न करता विलीन होतात. तसेची स्त्री पुरुषाच्या नात्याची वीण घट्ट होण्यासाठी सुदृढ शारीरिक संबंध अत्यंत गरजेचे आहेत. स्त्री पुरुषांमध्ये शारीरिक ओढ हि अत्यंत सर्वसाधारण भावना आहे. शिवाय हे संबंध पुढील पिढी निर्माण करीत असतात, हे आपण सारेच जाणतो. पण यासाठी शारीरिक संबंध सुदृढ असणे अत्यंत गरजेचे आहे.
अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा असते मात्र शरीर साथ देत नाही. अश्यावेळी शरीरावर जबरदस्ती करून पार्टनरसोबत संबंध निर्माण करणे दोघांसाठी हानिकारक असते. मुळात शारीरिक संबंध निर्माण करण्याचे प्रमाण भले कमी असेल पण त्याचा दर्जा उत्तम असेल तर प्रजनन प्रक्रियेत अडथळा येत नाही. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरातील थकवा आपल्या इच्छेनुसार साथ देत नाही. त्यामुळे शारीरिक संबंधांबाबत ओढ कमी होते परिणामी पार्टनरसोबतच्या नात्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून आम्ही तुमच्यासाठी अश्या काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्या तुमच्यासाठी खूप फायद्याच्या ठरतील. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) शरीर संबंध निर्माण करण्यापूर्वी दोघांनीही ब्रश करणे आणि कोमट पाण्याने अंघोळ करावी. यामुळे शरीरातील थकवा निघून जातो आणि मूड रिफ्रेश होतो.
२) शरीर संबंधांपूर्वी शरीरातून दुर्गंध उत्सर्जित करणारे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. यात प्रामुख्याने कांदा, लसून, सुकं खोबर, खडा मसाला या पदार्थांचा समावेश आहे. हे पदार्थ खाल्ल्याने शरीरातून दुर्गंध येतो आणि पार्टनरची इच्छा शमते.
३) या प्रक्रियेच्या ३ तास आधी अन्न आणि जल घेऊ नये. त्यामुळे पोटाचा प्रॉब्लम होऊ शकतो. परिणामी अपचन किंवा गॅसेसच्या समस्या उदभवतात.
४) शरीर संबंधांच्या किमान ३ तासआधी मनुका आणि अक्रोडाचे यांचे सेवन करावे. यामुळे शारीरिक ऊर्जा कायम राहते.
५) शारीरिक आणि मानसिक ताण तणाव दूर करण्यासाठी रोज व्यायाम करा. ज्यामुळे थकवा येणार नाही आणि तुमचा पार्टनर तुमच्यावर रुसणार नाही.
६) शारीरिक संबंध सुदृढ होण्याकरिता मेडिटेशन हा निश्चितच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे यासाठी रोज किमान १० मिनिटे योगाभ्यास आणि ध्यानधारणा करावी. यामुळे डोकं शांत आणि मन सुदृढ राहते.
७) सगळ्यात महत्वाचे म्हणजे शारीरिक संबंधादरम्यान तुमच्या पार्टनरच्या संमतीने काही वेळ थांबा.
८) यासाठी मूड रिफ्रेश असण्याची गरज असणे त्यामुळे सतत शरीरातील मेद वाढणार नाहीत याची काळजी घ्या.