दूध, दही, ताक पिण्याच्या वेळा पाळाल तर मिळतील आरोग्यवर्धक लाभ; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या आरोग्याचे बिघडते चक्र यास सर्वस्वी कारणीभूत असणारे कारण म्हणजे चुकीच्या वेळी चुकीचे खाणे पिणे. होय. याशिवाय रोजची धावपळ, दगदग, रिकामे पोट आणि अन्य सवयी देखील काहीश्या प्रमाणात आरोग्यावर वाईट परिणाम करीतच असतात. आयुर्वेदानुसार आपलं शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आहे. यानुसार वेळी – अवेळी अन्न पदार्थांचे सेवन करणे शारीरिक तत्त्वांचे संतुलन बिघडवते आणि आपल्याला आजारांची लागण होते. प्रामुख्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाची वेळ पाळणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. अनेकांच्या दैनंदिन आहारात दूध, दही आणि ताक असते. मुख्य म्हणजे या तिन्ही पदार्थांचे आरोग्यासाठी विविध लाभ आहेत पण याच्या वेळा चुकल्या तर यामुळे आरोग्याला धोका देखील होवू शकतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला दूध, दही आणि ताकाचं सेवन करण्याची योग्य वेळ सांगणार आहोत शिवाय यामुळे आरोग्याला होणारे लाभदेखील सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
० दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?
– आयुर्वेदामध्ये दुधाला संपूर्ण आहार असे म्हटले जाते. कारण शरीराला आवश्यक ती सर्व पोषकतत्त्व दुधात असतात. त्यामुळे दुधाचं सेवन आपण दिवसभरात कधीही करू शकतो. पण रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्यास संपूर्ण शरीराचा थकवा निघून जातो आणि अनिद्रेचा त्रास नाहीसा होतो.
मुख्य म्हणजे, दूध पचण्यास जड असते. त्यामुळे सकाळच्यावेळी दूध प्यायल्याने दिवसभर शरीरात उर्जा राहते. आयुर्वेद सांगते कि, अन्य कोणत्याही अन्न पदार्थांसोबत दुध पिणे टाळावे. कारण यामुळे पचनप्रक्रियेवर परिणाम होतो.
० दुधामुळे शरीराला होणारे फायदे कोणते?
– दूध प्यायल्याने शरीराला अनेको लाभ होतात. जाणून घ्या खालीलप्रमाणे :-
१) स्नायू आणि हाडे मजबूत होतात – हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेले कॅल्शियमचे प्रमाण दुधामध्ये भरपूर प्रमाणात असतं. दुधातील पोषक तत्त्वांमुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. यामुळे हाड्यांच्या समस्यांतून आराम मिळतो.
२) दातांचे आरोग्य – दुधाच्या सेवनामुळे दात देखील मजबूत होतात. दुधामध्ये दातांसाठी पोषक असलेले कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयोडीनचं प्रमाण जास्त आहे. निरोगी दातांसाठी नियमित दुधाचं सेवन करणं फायदेशीर ठरेल. दातांच्या समस्या निर्माण होणार नाहीत.
३) वजन कमी होते – दही पूर्ण अन्न असून त्यात आपल्या शरीरास पूरक ऊर्जा देणारे अनेको घटक समाविष्ट असतात. परिणामी, दूध प्यायल्याने बराच वेळ पोट भरलेले राहते आणि भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
० दही खाण्याची योग्य वेळ कोणती?
– आयुर्वेद सांगते कि, दुपार होण्याआधी दही खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. कारण रिकाम्या पोटी दह्याचं सेवन केल्यास कमी रक्तदाबाचा त्रास होतो. म्हणून रिकाम्या पोटी दही खाण्याऐवजी नाश्त्यामध्ये दह्याचा समावेश करा. अनेकांना रात्रीच्या जेवणासोबत दह्याचं सेवन करण्याची सवय असते. परंतु, रात्रीच्या वेळी दही खाणं आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. कारण दही थंड असते. त्यामुळे दह्याचे रात्री सेवन केल्यास सर्दी – खोकला आणि फुफ्फुसांच्या आजारांसोबत गुडघेदुखीचा त्रास होतो. दही गरम करून खाणेदेखील हानिकारक आहे. त्यामुळे अशी चूक करणे प्रामुख्याने टाळा.
० दह्यामुळे शरीराला होणारे फायदे कोणते?
– शीतल प्रवृत्तीचे दही आपल्या आरोग्याला विविध लाभ देते. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते – दही खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. कारण दह्यातील पोषक तत्त्वांमध्ये शरीरातील घातक जिवाणू नष्ट करण्याची क्षमता असते.
२) पचनक्रिया सुधारते – दह्यामध्ये शरीरास पोषक असे जिवाणू (बॅक्टेरिया) असतात आणि यातील प्रोबायोटिक लॅक्टोज शरीराची पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत करतात.
३) हृदयासाठी लाभदायक – दह्याचे सेवन केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते. परिणामी हृदयाच्या विविध त्रासांपासून आराम मिळतो.
० ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?
– आयुर्वेदानुसार, दिवसभरात कोणत्याही वेळेस ताक पिणे लाभदायक आहे. बरेच जण जेवण जेवल्यानंतर न विसरता ताक पिणं पसंत करतात. पण संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस ताक पिण्यापूर्वी आधी हवामानाचा अंदाज घेत चला. अन्यथा सर्दी आणि घश्यात खवखव असे त्रास होऊ शकतात.
० दह्यामुळे शरीराला होणारे फायदे कोणते?
– दह्यापासून तयार होणारे ताक शरीरातील पाण्याची कमतरता भरून ठेवण्यास मदत करते. जाणून घ्या फायदे खालीलप्रमाणे :-
१) पोटाच्या विकारांवर आराम – ताक प्यायल्याने पित्त, मळमळ आणि पोटात ढवळणे अश्या त्रासांपासून सुटका मुळते. इतकेच काय तर अनेको पोटाच्या विकारांवर ताक प्रभावी आहे.
२) अपचनाच्या त्रासावर प्रभावी – ताक प्यायल्यामुळे अपचनाचा त्रास दूर होतो. शिवाय जड जेवण झाल्यास अन्न पचण्यासाठी ताकाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
३) शरीरास थंडावा – ताकाची प्रवृत्ती थंड असल्यामुळे छातीत जळजळ होत असेल किंवा पोटात मुरडा पडला असेल तर ताक पिणे फायद्याचे ठरते.